सोलापूर शहरासह सहा तालुक्यातील आजपासून निर्बंध शिथिल
सोलापूर शहरासह जिल्ह्यातील सहा तालुक्यात कोरोना निर्बंध शिथिल करण्यात आल्याची घोषणा जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी केली.;
सोलापूर : कोरोनाच्या पार्श्वभुमीवर सोलापूरात लावण्यात आलेले निर्बंध आजपासून शिथिल करण्यात येणार आहेत. सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील सहा तालुक्यामध्ये निर्बंध शिथिल होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली.
सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ, बार्शी, अक्कलकोट, मंगळवेढा, दक्षिण सोलापूर आणि उत्तर सोलापूर या तालुक्यातील निर्बंध आजपासून पुढील आदेश येईपर्यंत शिथिल करण्यात आले आहे.
या नव्या निर्णयानुसार निर्बंध शिथिल करण्यात आलेल्या भागांमध्ये दुकाने, रेस्टोरंट, मॉल, हॉटेल्स हे रात्री 10 वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. तर मंगलकार्यालयामध्ये फक्त 100 जणांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रम पार पाडण्यासाठी मुभा देण्यात आली आहे.
मात्र, या नव्या निर्णयानुसार धार्मिकस्थळे, चित्रपटगृहे आणि नाट्यगृहे हे अद्याप बंदच असणार आहेत असं जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी स्पष्ट केले.