कोरोनाचा महाविस्फोट: 49 हजार 447 नव्या रुग्णांची नोंद; आज राज्यात 277 कोरोना रुग्णांचा मृत्यू

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे कोणत्याही क्षणी राज्यव्यापी टाळेंबदीची घोषणा करण्याच्या तयारीत असताना आज राज्यात कोरोना संकटाचा महाविस्फोट झाला आहे. आज पुन्हा एकदा कोरोना संसर्गाने आता प सर्वोच्च उसळी घेत चोवीस तासात 49 हजार 447 रुग्णांची आज राज्यात नोंद झाली असून 277 कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नोंदीनं राज्यात पुन्हा चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे.;

Update: 2021-04-03 15:49 GMT

आज दिवसभरात राज्यात तब्बल 49 हजार 447 कोरोनाग्रस्त आढळले आहेत. तर आज मृतांचा आकडासुद्धा वाढून राज्यात तब्बल 277रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. सध्या राज्यातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 84.49 टक्के असून मृत्यूदर 1.88 टक्क्यांवर पोहोचलाय. राज्यातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा 29,53,523 वर पोहोचला आहे. राज्यात आतापर्यंत 24,95,315 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

मुंबईला कोरोनाचा उद्रेक

मुंबई जिल्ह्यात बाधितांचा आकडा 4,41,475 वर पोहोचला आहे. मुंबईत एकूण 3,67,899 रुग्ण बरे झाले असून येथे आतापर्यंत 11,754 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मुंबई जिल्ह्यात सध्या 60,846 सक्रिय कोरोना रुग्णांवर उपचार सुरु आहे.

 



ठाण्यात आतापर्यंत 6,111 जणांचा मृत्यू

ठाणे जिल्ह्यातसुद्धा कोरोना रुग्णांमध्ये दररोज वाढ होत आहे. येथे कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यास प्रशासनाला यश येत नाहीये. ठाण्यात बाधितांचा आकडा 3,54,846 वर पोहोचला आहे. तर आतापर्यंत येथे 3,00,044 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. ठाणे जिल्ह्यात आतापर्यंत 6,111 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला असून सध्या येथे 48,660 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरु आहेत.



 

पुण्यात तब्बल 73,599 रुग्णांवर उपचार सुरु

पुणे जिल्ह्यात कोरोनाची परिस्थिती तर अतिशय विदारक आहे. येथे सध्या 73,599 सक्रिय कोरोना रुग्णांवर उपचार सुरु आहेत. पुणे जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनामुळे एकूण 8,425 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला आहे. तर पुण्यात बाधितांचा आकडा 5,64,286 वर पोहोचला असून येथे आतापर्यंत 4,82,214 जण कोरोनामुक्त झाले आहेत.

मुंबई शहरात कोरोनाचा सर्वोच्च संसर्ग

मुंबई शहरात आज दिवसभरात 9,108 संशयितांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली. आज दिवसभरात मुंबईत 27 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली. एकट्या मुंबईत कोरोनाबाधितांचा आकडा 4,41,475 वर पोहोचला आहे. मुंबई महापालिका क्षेत्रात आतापर्यंत 3,67,899 जण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईत सध्या 60,846 सक्रिय कोरोनाग्रस्तांवर उपचार सुरु असून येथे आतापर्यंत 11,754 जणांचा मृत्यू झाला आहे.


 



टास्कफोर्सच्या मागील आठवड्यात झालेल्या बैठकीमध्ये राज्यव्यापी लॉकडाऊनडच्या तयारीचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले होते. आज झालेल्या संबोधनात मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊनसाठी दोन दिवसाचा अलर्ट दिला आहे.

परंतु कडक लॉकडाऊन असावा अशी अपेक्षा मोठ्या संख्येने राजकीय पक्ष आणि नागरिकांकडून व्यक्त होत आहे त्यामुळे राज्य सरकार देखील आता संभ्रमावस्थेत असले तरी मुख्यमंत्री कोणत्याही क्षणी लॉकडाऊन किंवा कठोर निर्णय लावतील हे आता नक्की झालं आहे.

Tags:    

Similar News