महापालिका, नगरपालिकांमधील कर्मचाऱ्यांना 50 लाखांचो विमा कवच

Update: 2021-07-29 02:28 GMT

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रिमंडळाची बैठक घेण्यात आली. या बैठकीत कोव्हिडच्या पहिल्या लाटेत कर्तव्य बजावताना मृत पावलेल्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना ५० लाख रुपयांचे विमा कवच देण्याचा निर्णय घेण्यात आला.

राज्यातील क व ड वर्ग महापालिका तसेच नगरपंचायती व नगर परिषदा यामधील कोविड कर्तव्य पार पाडतांना मरण पावलेल्या अधिकारी किंवा कर्मचाऱ्यास ५० लाख रुपयांचे विमा कवच देण्याच्या निर्णयाला आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते.

अ आणि ब वर्ग महानगरपालिका वगळता इतर सर्व महानगपालिका तसेच सर्व नगर परिषदा व नगर पंचायती यांना ही योजना लागू राहील. त्याचप्रमाणे सफाई कर्मचारी, कंत्राटी व मानधन तत्त्वावरील व बाह्यस्त्रोत कर्मचाऱ्यांचा देखील यात समावेश करण्यात येईल.

Tags:    

Similar News