लसीकरणात महाराष्ट्र नंबर 1, देशात 62 कोटी नागरिकांचे लसीकरण

Update: 2021-08-28 14:08 GMT

देशात कोरोनावरील लसीकरणाचा वेग आता चांगलाच वाढला आहे. शनिवारी देशभरात कोरोनाचे डोस घेतलेल्या नागरिकांची संख्या 62 कोटी 30 लाख एवढी झाली आहे. तर शुक्रवारी देशभरामध्ये एका दिवसात लसीकरणाचा उच्चांक गाठला गेला. 27 ऑगस्ट रोजी देशात एक कोटी तीन लाख नागरिकांना कोरोनावरील लस दिली गेली.

लसीकरण झालेल्या नागरिकांमध्ये 45 ते 59 वयोगटातील 29 टक्के पुरुष, 60 वर्षांवरील नागरिक 20.8 टक्के, 18 ते 44 वयोगटातील महिला 42.2टक्के, आरोग्य कर्मचारी 3 टक्के आणि फ्रंटलाईन वर्कर्स 5 टक्के यांचा समावेश आहे.



 


लसीकरणात महाराष्ट्र नं 1

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत महाराष्ट्रात रुग्णांची संख्या सर्वाधिक होती. पण आता अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे लसीकरणामध्ये महाराष्ट्राने आघाडी घेतली आहे. कोरोनाचे दोन्ही दोस घेतलेल्या नागरिकांच्या संख्येत महाराष्ट्र देशात नंबर एक आहे. तर कोरोनाच्या लसीचा एक डोस घेतलेल्या नागरिकांच्या संख्येत उत्तर प्रदेशने आघाडी घेतली आहे. महाराष्ट्रात 5 कोटी 63 लाख 32 हजार 335 नागरिकांनी लस घेतली आहे. यापैकी दुसरा डोस घेणाऱ्या नागरिकांची संख्या 1 कोटी 50 लाख 95 हजार 680 आहे.




 



 



कोरोनाचे निर्बंध 30 सप्टेंबरपर्यंत

दरम्यान देशात कोरोनाचे रुग्णांची संख्या कमी झाली असली तरी केंद्र सरकारने कोरोनाचे निर्बंध 30 सप्टेंबरपर्यंत कायम राहणार असल्याची घोषणा केली आहे. दरम्यान कोरोनाच्या रुग्णांचा रिकव्हरी रेट 97.56 टक्के आहे.

Tags:    

Similar News