तर कोरोना लशीचं शॉर्टेज होणार: सीरम

भारतासह देशभर कोरोनाचा संसर्ग वाढत असताना अमेरिकेच्या सरकारनं उत्पादन सुरक्षा कायदा लागू केल्यानं करुणा लस बनविण्यासाठी आवश्यक कच्चा माल मागवण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे या प्रकरणात भारत सरकारनं हस्तक्षेप करावा, अशी मागणी सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियानं केली आहे.;

Update: 2021-03-09 03:32 GMT

HEADER:..



पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियामध्ये कोरोनावरील कोव्हिशिल्ड नावाच्या लसीचं उत्पादन सुरू आहे.सीरम इन्स्टिट्यूटने 6 मार्च रोजी वाणिज्य सचिव अनूप वधावन आणि परराष्ट्र सचिव हर्षवर्धन यांना पत्र लिहून ही मागणी केली आहे.कोव्हिशिल्ड लशीला भारतासह जगभरातून मोठ्या प्रमाणात मागणी आहे. मात्र, या लसीसाठीचं उत्पादन, कच्चा माल साहित्य हे अमेरिकेतील आयातीवर अवलंबून असल्याचं सीरमचे अधिकारी प्रकाश कुमार सिंह यांनी सांगितलं.जगभरात कोविशिल्डला मागणी

सीरम इन्स्टिट्यूट उत्पादन करत असलेल्या कोविशिल्ड लसीला देशात आणि जगभरात मोठ्या प्रमाणात मागणी आहे. लाखो नागरिक ही लस घेत आहेत. सीरम संस्था नोवावॅक्स (अमेरिका ), कोड्गेनिक्स (अमेरिका) अशा विविध संस्थांसोबत तांत्रिक सहकार्याने करोनावरील लसीच्या प्रकल्पांवर काम करत आहे. यासाठी आवश्यक उत्पादनं तसेच कच्चा माल, साहित्य हे अमेरिकेतील आयातीवर अवलंबून आहे, असं सीरमचे अधिकारी प्रकाश कुमार सिंह यांनी सांगितलं.

अमेरिकेच्या सरकारचा नवा कायदा

अमेरिकेच्या सरकारने उत्पादन सुरक्षा कायदा केला आहे. याद्वारे लस उत्पादनासाठी आवश्यक असणार्‍या औद्योगिक स्त्रोतांचे उत्पादन वा वितरणासाठी सरकारी आणि खासगी संस्था किंवा खाजगी पक्ष यांच्यातील काही करारांना प्राधान्य दिले जाणार आहे, असं सीरमने पत्रात म्हटलं आहे.

Tags:    

Similar News