#Covid19Vaccine : लहान मुलांसाठीची लस कधी? केंद्रीय आरोग्यमंत्र्यांचे मोठे विधान

Update: 2021-07-27 11:44 GMT

कोरोनाच्या संकटाला तोंड द्यायचे असेल तर लसीकरण हाच त्यावरील उपाय आहे. त्यामुळे जगभरात आता कोरोनावरील लसीकरण सुरू झाले आहे. कोरोनाच्या तिसऱ्या संभाव्य लाटेत लहान मुलांना सर्वाधिक धोका असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. अजूनही लहान मुलांची लस आलेली नसल्याने पालक चिंतेत आहेत. या पार्श्वभूमीवर आता एक दिलासादायक बातमी आली आहे. भारतात लहान मुलांना कोरोनावरील लस पुढच्या महिन्यापासून देण्यास सुरूवात होण्याची शक्यता आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांन दिली आहे. भाजपच्या संसदीय पक्षाच्या बैठकीत मांडवीय यांनी ही माहिती दिली आहे, असे वृत्त एएनआय या वृत्तसंस्थेने दिले आहे.

"लहान मुलांना कोरोनावरील लस देण्याची सुरूवात पुढील महिन्यापासून होण्याची शक्यता आहे." एवढेच नाही तर थोड्याच दिवसात भारत सगळ्यात जास्त लस निर्मिती करणारा देश होणार आहे, कारण आता अधिकाधिक कंपन्यांना लस निर्मितीची परवानगी दिली जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

लहान मुलांच्या कोरोना लसींची सद्यस्थिती काय?

काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारने दिल्ली हायकोर्टाला लहान मुलांसाठीच्या लसीबाबत माहिती दिली होती. यामध्ये Zydus Cadila ची १२ -१८ वर्षांच्या मुलांसाठीच्या लसीची चाचणी पूर्ण झाली असून सध्या ती मंजुरीच्या प्रक्रियेमध्ये आहे. दरम्यान देशाच्या औषध महानियंत्रकांनी Covaxin लसीची निर्मिती कऱणाऱ्या Bharat Biotech या कंपनीलाही २ ते १८ वर्षांपर्यंतच्या मुलांसाठी बनवलेल्या लसीच्या चाचणीची परवानगी दिल्याचीही माहिती केंद्र सरकारने हायकोर्टाला दिली होती, असे वृत्त इंडियन एक्प्रेसने दिले आहे. युरोपियन युनियमधील देशांमध्य सध्य १२ ते १५ वर्षांच्या मुलांसाठी Pfizer लस देण्यात येत आहे.

लहान मुलांसाठी कोरोनावरील लस प्रत्यक्षात देण्यास सुरूवात झाल्यानंतर बंद असलेल्या शाळा सुरू होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. तसेच लहान मुलांना असलेला कोरोनाचा धोका देखील कमी होऊ शकणार आहे. त्यामुळे ही लस कधी येईल याबाबत आता सगळ्यांना उत्सुकता आहे.

Tags:    

Similar News