पूरग्रस्तांचे दैनंदिन जीवन सुरळीत झाल्यानंतर लसीकरण सुरु करणार
पुरग्रस्त जिल्ह्यांमध्ये दैनंदिन जनजीवन सुरळीत झाल्यानंतर तातडीने कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरू करण्यात येईल असं राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं आहे.पुरग्रस्त जिल्ह्यातील सर्व भागांमध्ये निर्जंतुकिकरण करण्यावर सुरुवातीला भर देण्यात आला आहे असं टोपे यांनी स्पष्ट केले.
जालना: पुरग्रस्त जिल्ह्यांमध्ये दैनंदिन जनजीवन सुरळीत झाल्यानंतर तातडीने कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरू करण्यात येईल असं राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं आहे. ते जालना येथे पत्रकारांशी बोलत होते. पुरग्रस्त जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा पोझिटीव्हीटी रेट जास्त आहे. मात्र, या जिल्हयातील सध्याच्या परिस्थितीत सुधारणा करण्याबाबत प्रशासनाकडून प्राधान्य दिले जातं असल्याचे टोपे यांनी म्हटले आहे.
पुरग्रस्त जिल्ह्यातील सर्व भागांमध्ये निर्जंतुकिकरण करण्यावर सुरुवातीला भर देण्यात आला आहे. सोबतच आरोग्य विभागाकडून डॉक्टरांची एक टीम बनविण्यात आली असून त्यांच्यामार्फत या परिसरात साथीचे रोग येऊ नये म्हणून उपाययोजना करण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती आरोग्यमंत्री टोपे यांनी दिली. पूर येऊन गेल्यानंतर त्या भागामध्ये साथीचे रोग येण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने डॉक्टरांच्या टीम आणि आवश्यक औषधे त्या ठिकाणी पाठवण्यात आले असून दैनंदिन परिस्थिती सुरळीत झाल्यानंतर या जिल्ह्यांत कोरोना चाचणी आणि कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरळीत सुरु केलं जाईल आरोग्य मंत्री टोपे यांनी स्पष्ट केलं.