केंद्र सरकारने बुस्टर डोसमधील अंतर कमी केले, किती असणार अंतर?

केंद्र सरकारने बुस्टर डोसमधील अंतर कमी केले, किती असणार नवीन नियमांनुसार कालावधी, कोणता व्यक्ती घेऊ शकतो बुस्टर डोस? जाणून घेण्यासाठी वाचा…

Update: 2022-07-06 13:08 GMT

केंद्र सरकारच्या आरोग्य विभागाने एक पत्रक जारी केलं आहे. या पत्रकानुसार कोरोनाच्या बूस्टर डोस लसीमधील अंतर केंद्र सरकारने कमी केलं. दोन लसींमधील अंतर पुर्वी ९ महिने (३६ आठवडे) होते. ते आता ६ महिने (२६ आठवडे) केले आहे.

१८ ते ६० वर्षे वयोगटातील नागरिक खाजगी लसीकरण केंद्रावर ६ महिन्याच्या अंतराने लस घेऊ शकतात. तसंच फ्रन्टलाइन वर्कर आणि आरोग्य कर्मचारी तसंच ज्या नागरिकांचं वय ६० वर्षापेक्षा अधिक आहे. या नागरिकांना शासकीय योजनेनुसार लस मोफत दिली जाणार आहे. त्यानुसार कोव्हिड रजिस्टर application मध्ये बदल करण्यात आले आहेत.


Full View

Tags:    

Similar News

null