आज राज्यात कोरोनाचे ६,०६१ नवीन कोरोना रुग्णांचे निदान झाले तर ९,३५६ रुग्ण बरे होऊन घरी आले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण ६१ लाख ३९,४९३ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर राज्यात आज १२८ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.१ % एवढा आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९६.७२ % एवढे झाले आहे.
आज राज्यात आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ४,९३,७२,२१२ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६३,४७,८२० (१२.८६ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ४,३१,५३९ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २,७६१ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
राज्यातील ऍक्टीव्ह रुग्ण -
राज्यात आज रोजी एकूण ७१,०५० ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील जिल्हानिहाय ऍक्टिव्ह रुग्णांचा तपशील खालील प्रमाणे आहे.