कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेऊन नागरिकांनी काळजी घ्यावी - वडेट्टीवार

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी 15 ऑगस्टपासून लोकल रेल्वे प्रवास सुरू करण्याची घोषणा जरी केली असली तरी, तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेऊन नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केले आहे.

Update: 2021-08-10 06:32 GMT

यवतमाळ : मुंबई येथील लोकल रेल्वे प्रवासाला सुरुवात करण्यात यावी अशी मागणी गेल्या अनेक दिवसांपासून होत आहे. अनेक सामाजिक , राजकिय तसेच रेल्वे प्रवासी संघटनांनी यासाठी आंदोलने देखील केली. त्यानुसार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 15 ऑगस्ट पासून रेल्वे प्रवास सुरू करण्यास सहमती दर्शविली. मात्र, लोकल प्रवासासाठी कोरोना प्रतिबंधक लसींचे दोन डोस घेणं अनिवार्य आहे. याबाबत बोलतांना राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे की, लोकांच्या आग्रहामुळे हा निर्णय घ्यावा लागला आहे. मात्र, लोकांनी अजुनही कोरोना नियमांचे काटकोरपणे पालन केले पाहिजे.

दरम्यान कोरोना लसींच्या तुटवड्याबाबत पत्रकारांनी विचारले असता काहीतरी निकष ठेवणं तर गरजेचंच होत त्यामुळे किमान दोन डोस घेतल्यांनीच लोकल प्रवास करायला हवा कारण मुंबईच्या लोकलमध्ये प्रचंड गर्दी असते. त्यामुळे तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभुमीवर नागरिकांनी काळजी घेतलीच पाहिजे असं मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार म्हणाले. यवतमाळ जिल्हा दौऱ्यावर असतांना त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला.

Tags:    

Similar News