कोरोना निर्बंध, केंद्र सरकारचे सर्व राज्यांना महत्त्वाचे आदेश

Update: 2021-07-29 02:07 GMT

courtesy social media

देशात कोरोनाचे रुग्ण कमी होत आहे. काही राज्यांनी निर्बंध शिथिल केले आहेत. महाराष्ट्रातही गुरूवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची कोव्हीड टास्क फोर्स सोबत बैठक आहे. या बैठकीनंतर निर्बंध शिथिल करण्याबाबत विचार होण्याची शक्यता आहे. या सर्व पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने मात्र राज्यांना वेगळी सूचना केली आहे.

देशात कोरोनाची परिस्थिती अजूनही पूर्णपणे आटोक्यात आलेले नाही, त्यामुळे कोरोना रोखण्यासाठी लागू केलेले निर्बंध 31 ऑगस्टपर्यंत कायम ठेवावे, अशा सूचना केंद्र सरकारने केल्या आहेत. ज्या जिल्ह्यांमध्ये रुग्णवाढीचा दर जास्त आहे, त्या जिल्ह्यांमध्ये तर आणखी कडक निर्बंध लागू करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.

केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला यांनी यासंदर्भात सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना पत्र लिहून काही सूचना केल्या आहेत. कोरोनाचे रुग्ण देशात घटत आहेत. या पार्श्वभूमीवर निर्बंथ शिथिल करावे अशी मागणी होते आहे. पण कोरोना अजून पूर्णपणे गेलेला नाही, हे लक्षात घेऊन निर्णय घ्यावे लागणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येतील घट ही समाधानकारक आहे, पण अजूनही एक्टिव्ह रुग्णसंख्या मोठी आहे. त्यामुळे कोरोनाचा फैलाव होण्याची शक्यता जास्त आहे. त्याकरीता निर्बंध शिथिल करताना काळजीपूर्वक निर्णय़ घ्यायला हवा, असे भल्ला यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.

कोरोनाचे रुग्ण सापडत असलेल्या जिह्यांमध्ये कठोर निर्बंध लागू करावे, सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर गर्दीच्या ठिकाणी लोकांवर नियंत्रण ठेवावे. कोरोनाच्या नियमांचे कडकपणे पालन व्हावे यासाठी सर्व जिल्हा तसेच स्थानिक प्रशासनावर जबाबदारी टाका. तसेच नियमांच्या अंमलबजावणीत हलगर्जीपणा दिल्यास त्या अधिकाऱ्यांना जबाबदार धरा, अशाही सूचना केंद्राने केल्या आहेत.

Tags:    

Similar News