लहान मुलांसाठी कोरोनाची लस, भारतातील चाचण्या जुलैमध्ये?

after novavax’s good results serium institute planning to start trials on children in july

Update: 2021-06-18 04:29 GMT

 कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर तिसऱ्या लाटेचा धोका आहे आणि त्यात सर्वाधिक बाधा लहान मुलांना होण्याची शक्यता आहे, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. पण आता यासंदर्भात एक दिलासादायक बातमी आली आहे. अमेरिकेतील नोव्हाव्हॅक्स या कंपनीने लहान मुलांसाठी तयार केलेली लस भारतात उपलब्ध करुन देण्याची तयारी पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूटने Serum केली आहे.  एएनआय या वृत्तसंस्थेने सूत्रांच्या हवाल्याने हे वृत्त दिले आहे. या लसीचे भारतातील नाव कोव्हाव्हॅक्स Covovax असेलही असेही सांगण्यात येत आहे. जुलैपासून भारतात या लसीच्या चाचण्या सुरू करण्याचा सीरम इन्स्टिट्यूटचा प्रयत्न आहे, अशीही माहिती या वृत्तात देण्यात आली आहे. नोव्हाव्हॅक्स लसीची परिणामकारकता अत्यंत चांगली असून भारतात या लसीच्या चाचण्या लवकरच सुरु होतील, असेही सीरम इन्स्टिट्यूटने सांगितले आहे. Novavax announced excellent results from its PREVENT-19 phase

नोव्हीहॅक्स लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचण्यांमध्ये 90.4 टक्के परिणामकारकता दिसून आली आहे. जी माहिती सध्या प्रसिद्ध होत आहे त्यानुसार ही लस सुरक्षित आणि परिणामकारक आहे, असे दिसते, असे मत नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही.के.पॉल VK Paul यांनी व्यक्त केले आहे. नोव्हाव्हॅक्स कंपनीने भारतात या लसींच्या निर्मितीसाठी सीरम इन्स्टिट्यूटसोबत करार केला आहे. दरम्यान लहान मुलांवरील कोरोना लसीच्या चाचणीसाठी दिल्लीच्या एम्समध्ये 6 ते 12 वर्षांच्या मुलांचे स्क्रीन मंगळवारपासून सुरू करण्यात आले आहे. 

Tags:    

Similar News