महाराष्ट्रात लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांची संख्या एक कोटींवर

facebooktwitter-greylinkedin
Update: 2021-07-26 11:55 GMT
महाराष्ट्रात लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांची संख्या एक कोटींवर
  • whatsapp icon

मुंबई : राज्यात एकीकडे कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असताना आता आणखी एक दिलासादायक माहिती समोर आली आहे. राज्यात कोरोनावरील लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांची संख्या आता १ कोटींच्या वर गेली आहे. दोन्ही डोस देऊन एक कोटीहून अधिक नागरिकांचे कोरोनापासून संरक्षण करण्याचे काम आरोग्य विभागाने पार पाडले आहे. या कामगिरीबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आरोग्य विभागाचे कौतुक केले आहे.

सोमवारी संध्याकाळी चार वाजेपर्यंत राज्यात दिवसभरात सुमारे पावणेचार लाख नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. तर दोन्ही डोस देण्यात आलेल्या नागरिकांची संख्या एक कोटी 64 हजार 308 एवढी झाली आहे. आतापर्यंत राज्यातील तीन कोटी 16 लाख 9 हजार 227 नागरिकांना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे. तर सोमवारी सुरु असलेल्या लसीकरणामुळे दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांच्या संख्येने एक कोटींचा टप्पा पार केला आहे, असे आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ.प्रदीप व्यास यांनी सांगितले.

राज्यात आज सुमारे 4100 लसीकरण केंद्र सुरु असून त्याद्वारे सायंकाळी 4 वाजेपर्यंत तीन लाख 75 हजार 974 नागरिकांचे लसीकरण झाले. संध्याकाळी उशीरापर्यंत या संख्येत वाढ होऊ शकते, असे डॉ.व्यास यांनी सांगितले.

Tags:    

Similar News