Lancet या जगप्रसिद्ध मासिकाने जो अहवाल प्रसिद्ध केला. त्यात कोरोनाने जे मृत्यू झाले त्यात 21 देशात 11 लाख 34 हजार मुले अनाथ झाली तर भारतात कोरोनाने अनाथ झालेली संख्या 1 लाख 16 हजार आहे. ही संख्या जगातील तिसऱ्या क्रमांकाची असून त्यात भारतात पुरुषांचे मृत्यू हे 91 हजार झाले आहेत. याचा अर्थ 91 हजार विधवा कोरोनाने भारतात झाल्या आहेत.
देशात एकूण मृत्यू हे 4 लाख 19 हजार तर महाराष्ट्रात 1 लाख 30 हजार म्हणजे देशाच्या 32 टक्के मृत्यू हे महाराष्ट्रात झाले. याचा अर्थ 90 हजार पैकी 30 हजार विधवा या महाराष्ट्रात असू शकतात. ही संख्या फक्त ज्यांची लहान मुले आहेतय त्यातील आहे म्हणजे ही संख्या मोठी असू शकते.
Post covid ने झालेले मृत्यू, घरी झालेले मृत्यू यात धरलेले नसतात व संख्येबाबत चा संभ्रम बघता ही संख्या अजूनही जास्त असू शकते.
आम्ही कोरोना एकल महिला पुनर्वसन समितीच्या वतीने हाच अंदाज व्यक्त करत होतो. आमच्या अंदाजापेक्षाही ही संख्या जास्त आहे.
किमान जागतिक अभ्यासाने हेच वास्तव आता अधोरेखित केल्याने सरकारने तातडीने विधवा पुनर्वसन धोरण जाहीर करावे व या महिलांना मदत करावी. जे आम्हाला गावागावात दिसले तेच वास्तव आता जागतिक अभ्यासातून पुढे आले आहे.