दिलासादायक : मुंबईत 24 तासातील रुग्णसंख्या घटली
कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येने सगळ्यांचीच चिंता वाढवली असताना आता मुंबईकरांसाठी दिलासादायक बातमी आली आहे.;
मुंबईसह संपूर्ण राज्यात कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येनं सगळ्यांची चिंता वाढली आहे. पण गेल्या 24 तासातील आकडेवारीनं मुंबईकरांना काहीसा दिलासा मिळाला आहे. गेल्या चोवीस तासात मुंबईत कोरोनाच्या नवीन रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या अधिक आहे. गेल्या 24 तासात मुंबईत 5 हजार 888 रुग्ण आढळले आहेत. तर बरे झालेल्या रुग्णांची संख्या यापेक्षा खूप जास्त आहे. गेल्या 24 तासात तब्बल 8 हजार 549 रुग्ण बरे कोरोनामुक्त झाले आहेत. पण गेल्या 24 तासात तब्बल 71 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे एकूण मृतांची संख्या 12 हजार 719 झाली आहे. मुंबईत कोरोना रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण 85 टक्के एवढे आहे. तर रुग्ण दुपटीचा कालावधी 54 दिवसांवर गेला आहे. तर 17 एप्रिल ते 23 एप्रिल या काळात रुग्णवाढीचा दर 1. 26 टक्के एवढा आहे.