देवेंद्र फडणवीस गृहमंत्री असल्याने ही चौकशी राजकीय असल्याची शंका- वैभव नाईक
राज्यात झालेल्या सत्ताबदलानंतर शिवसेना विरुध्द भाजप संघर्ष अधिक तीव्र झाला आहे. त्यातच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळचे आमदार वैभव नाईक यांची एसीबीद्वारे चौकशी करण्यात आली. या चौकशीनंतर आमदार वैभव नाईक यांनी प्रतिक्रीया दिली आहे. यावेळी त्यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.