प्रियंका गांधी : नवी इंदिरा अम्मा ?
तेलंगणात प्रियंका गांधी यांना लोकांनी इंदिरा अम्मा सारख्या असल्याचं म्हटलं आहे. मात्र प्रियंका गांधी खरंच नव्या इंदिरा अम्मा आहेत का? जाणून घेण्यासाठी हा रिपोर्ट नक्की पहा...;
गेल्या काही दिवसांमध्ये प्रियंका गांधी आक्रमक झाल्या आहेत. त्यामुळे प्रियंका गांधी यांच्यात आम्हाला इंदिरा गांधी दिसत असल्याची चर्चा काँग्रेसमध्ये सुरु आहे. त्यातच तेलंगणात प्रियंका गांधी यांनी थेट इंदिरा गांधी यांची आठवण काढली आहे. यावेळी मला लोक तुम्ही इंदिरा अम्मा असल्याचे म्हणतात. मला या गोष्टीचं कौतुक वाटतं की, ४० वर्षापूर्वीच्या व्यक्तीशी म्हणजे माझ्या आजीशी तुलना करून तुम्ही मला माझ्या जबाबदारीची जाणीव करून दिली आहे, अशी भावना व्यक्त केली.
उत्तर प्रदेशमध्येही प्रियंका गांधी यांनी मै लडकी हूँ, मैं लढ सकती हूँ, असं म्हणत भाजप विरोधात रणशिंग फुंकले होते. त्याच पध्दतीने त्याच आक्रमकपणे प्रियंका गांधी यांनी तेलंगणामध्येही लोकांना आपलंसं केलं आहे. त्यामुळेच प्रियंका गांधी यांना तेलंगणामध्ये इंदिरा अम्मा सारख्या असल्याचं म्हटलं जातंय.