चालू वित्त वर्षाच्या पहिल्या तिमाहीत राज्य सरकारचं उत्पन्न घटलं आहे. एप्रिल ते जून या महिन्यात सरकारला मिळालेल्या उत्पन्नात मोठी घट झाली आहे. दुसरीकडे केंद्र सरकारच्या उत्पन्नात मोठी वाढ पाहायला मिळत आहे. याच काळात देशातील कंपन्यांनी देखील मोठ्या प्रमाणात कमाई केली आहे.
या संदर्भात Business Standard ने वृत्त दिलं आहे. 17 राज्याच्या महसूलाचं बिज़नेस स्टॅडर्ड ने विश्लेषण केलं आहे. 2022 च्या पहिल्या तिमाहीत या 17 राज्याचा महसूल 3.11 लाख कोटी रुपये आहे. दुसरीकडे गेल्या वर्षी 2020 ला पहिल्या तिमाहीत या राज्याचं उत्पन्न 3.38 लाख कोटी रुपये इतकं होतं.
मात्र, 17 राज्यापैकी 3 राज्यांनी गेल्या वर्षी पेक्षा अधिक महसूल मिळवला आहे. तेलंगाना, पंजाब आणि हरियाणा या राज्याने गेल्या वर्षाच्या तुलनेत अधिक महसूल मिळवला आहे.
तर 12 राज्याचा महसूल गेल्या दोन वर्षापेक्षा कमी राहिलेला आहे. तर दुसरीकडे केंद्र सरकारचा गेल्या दोन वर्षात सकल राष्ट्रीय उत्पन्नात वाढ झाली आहे. ही वाढ 4 लाख कोटी रुपयांवरून 5.3 लाख कोटी रुपयावर गेली आहे. यामध्ये केंद्र सरकारच्या करातील राज्याच्या हिस्स्याचा देखील समावेश आहे.
राज्यांचा महसूल गेल्या दोन वर्ष 8 टक्क्याने कमी झाला आहे. केंद्र सरकारकडून राज्य सरकारला (राज्य सरकारचा हिस्सा) मिळणाऱ्या करामध्ये 23 टक्के घट झाली आहे. राज्याच्या महसूलात एवढ्या मोठ्या प्रमाणात घट होऊनही राज्य सरकारने आपल्या खर्चात कोणतंही घट केली नसल्याचं दिसून येत आहे.
यामध्ये महसूल खर्च, प्रशासनीक खर्च, वेतन, पेंशन, कल्याणकारी योजनांमध्ये या दोन वर्षांमध्ये 14 टक्के वाढ झाली आहे.
कोरोना महामारीमुळे केंद्र सरकार बरोबरच राज्य सरकारने मोठा निधी यावर खर्च केला आहे. मात्र, त्यामुळे विविध सरकारी योजनांवर मोठा परिणाम झाल्याचं अहवालात म्हटलं आहे.