अदानीचं उत्पन्न घटलं, श्रीमंत व्यक्तीच्या यादीत दुसऱ्या नंबरवरून तिसऱ्या नंबरवर घसरण
अदानीचं उत्पन्न का घटलं, देशातील ६ एअरपोर्ट ५० वर्ष चालवण्याचं टेंडर घेऊन अदानींना कोरोना काळात फटका बसला का? Gautam Adani slips to third spot on Asia's rich list
काही काळा अगोदर अदानी ग्रुपचे चेअरमन गौतम अदानी हे आशिया खंडातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीमध्ये दुसऱ्या क्रमांकावर होते. त्या काही काळ ते रिलाअन्सचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांना माघे टाकतील. मात्र, शेअर्स ढासळल्यामुळे अंबानी व अदानी यांच्यात १.२५ लाख कोटी रुपयांचा फरक पडला आहे. एकेकाळी वेगाने प्रगती करणारे अदानी २०२१ मध्ये सगळ्यात जास्त व्यापारात खाली आलेले व्यापारी आहेत.
ग्रुपच्या शेअर्समध्ये घसरण झाल्याने गौतम अदानी यांच्या संपत्तीतही घट झालेली आहे. त्यामुळे आता ते आशियामधील तिसरे श्रीमंत व्यक्ती आहेत. ब्लूमबर्ग बिलियनर्स इंडेक्सच्या मते त्यांची एकूण संपत्ती ५.०१ लाख कोटी रुपये इतकी आहे. तर एकीकडे मुकेश अंबानी यादीमध्ये पहिल्या क्रमांकावर असून, त्यांची एकूण संपत्ती ६.२६ लाख कोटी रुपये इतकी आहे.
आशियामध्ये सर्वात श्रीमंत लोकांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर वाटर किंग झोगं शानशांन आहे. त्यांची एकूण संपत्ती ५. १४ लाख कोटी इतकी आहे. विशेष म्हणजे आशियातील ५ सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत अदानी अंबानी वगळता सर्व चीनी व्यावसायिक आहेत. चौथ्या क्रमांकावर मा हुअतेंग आहेत, त्यांची संपत्ती ४.४२ लाख कोटी इतकी असून अलिबाबाचे संस्थापक जैक मा पाचव्या क्रमांकावर असून त्यांची संपत्ती ३.५८ लाख कोटी इतकी आहे.
मागचा आठवडा अदानी ग्रुपसाठी कठीण होता. दरम्यान ग्रुपच्या कंपनीच्या शेअर्सची किंमत १.५ लाख कोटीपेक्षा जास्तीने घसरली आहे. १४ जून अगोदर मार्केट उघडण्यापूर्वीच बातमी आली की, अदानी ग्रुपच्या कंपनीमध्ये ३ अशा विदेशी कंपन्यांच्या गुंतवणूकदारांची गुंतवणूक आहे. ज्यांच्या डिटेल्स डेपोजिटर्सकडे सुद्धा नाही. त्यांनतर आठवड्याभरात अदानी पावर, अदानी ट्रान्समिशन, अडाणी टोटलचे शेअर्स सोमवार ते शुक्रवार दरम्यान दररोज ५ टक्क्यांनी घटले. म्हणजेच लोअर सर्किट लागलं.
अशाच पद्धतीने अदानी ग्रीन एनर्जी शेअर्समध्येही १४, १७ आणि १८ जूनला लोअर सर्किट लागलं आणि या तीनही दिवशी ५ टक्क्यांनी घसरण झालेली पाहायला मिळाली. मात्र, ग्रुपच्या चीफ फायनानशिअल ऑफिसरने हे पूर्णतः चुकीचं असल्याचं म्हंटलं आहे.
ज्या विदेशी कंपन्यांना बाबत प्रश्न चिन्ह निर्माण झालं आहे. त्यामध्ये अलबुला इन्वेस्टमेंट फंड, क्रेस्टा फंड आणि एपीएमएस इन्वेस्टमेंट आहेत. नॅशनल सिक्युरिटी डीपॉजिटरी लिमिटेड ने सांगितल्यानुसार, अदानींच्या कंपन्यांमध्ये या कंपन्यांची एकूण गुंतवणूक ४३,५०० कोटी इतकी आहे. मात्र, याबाबत सेबीकडे कोणतीही माहिती नाही. सोबतच या पैशांच्या मालकाचाही तपास नाही. त्यामुळे मनी लॉन्चिंग ऍक्टनुसार यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.
ग्रुपमधील ६ कंपन्यांचे एकूण मार्केट कॅप ११ जूनला मार्केट बंद झाल्याने ९ लाख ४२ हजार ८९५ कोटी रुपये झाले असून १९ जूनला क्लोजिंग नंतर १ लाख ५२ हजाराने कमी होत ७ लाख ९० हजार २७८ कोटी झाले आहे.
या सगळ्या कारणांमुळे आता येणारे दिवस अदानींच्या कंपन्यांसाठी कठीण ठरणार आहेत. नुकतंच देशातील ६ एअरपोर्ट ५० वर्ष चालवण्याचं टेंडर अदानींनी हाती घेतलं होत, मात्र गेले १४ महिने कोरोनामुळे एअर लाईन्सचा व्यवसाय ठप्प आहे. पुढचे काही दिवस सुद्धा अशीच परिस्थिती असणार आहे. अदानींचा ऑस्ट्रेलियामधील कोळश्यांच्या खाणींचा व्यवसाय सुद्धा अडकून पडला आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे भारतीय स्टेट बँक सुद्धा यांना कर्ज देण्यास नकार देत आहे.