अच्छे दिन आले का?, यंदाचा विकासदर उणे 7.7 टक्के राहणार...
अच्छे दिन आले का?, यंदाचा विकासदर उणे 7.7 टक्के राहणार...;
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज संसदेच्या दोन्ही सभागृहाच्या प्रतिनिधींसमोर अभिभाषण केलं. राष्ट्रपतींच्या या भाषणानंतर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमन यांनी केंद्र सरकारचा आर्थिक पाहणी अहवाल संसदेच्या सभागृहाच्या पटलावर ठेवला.
काय सांगतो अहवाल?
देशाच्या आर्थिक स्थितीचं चित्र सांगणाऱ्या यंदाच्या आर्थिक पाहणी अहवालातून देशाची आर्थिक स्थिती अत्यंत वाईट असल्याचं चित्र दिसून येतं. कोरोनामुळे देशाची आर्थिक स्थिती ढासळली असल्याचे आकडे सांगत आहेत.
येत्या आर्थिक वर्षामध्ये देशाचा विकास दर उणे ७.७ टक्के इतका राहणार असल्याचा अंदाज आर्थिक पाहणी अहवालात मांडण्यात आला आहे. तर येत्या २०२१-२२ आर्थिक वर्षात विकासदर ११ टक्क्यांपर्यंत जाईल. असा आशावाद व्यक्त करण्यात आला आहे. तर देशाची वित्तीय तूट जीडीपीच्या ७.२५ टक्के इतकी राहणार असल्याचा अंदाज अहवालात व्यक्त करण्यात आला आहे.