Beed Son in law Donkey Ride: 'या' गावचे जावई व्हाल तर चपलाचा हार घालून काढली जाईल गाढवावरून धिंड
अनेक ठिकाणी जावयाचा मोठा मानपान राखला जातो. मात्र बीड जिल्ह्यातील एका गावात जावयाची चक्क चपलाचा हार घालून तोंडाला रंग लावत गाढवावरून मिरवणूक काढली जाते. नेमका काय आहे प्रकार जाणून घेण्यासाठी वाचा...
अनेक ठिकाणी जावयाचा मोठा मानपान राखला जातो. मात्र बीड जिल्ह्यातील एका गावात जावयाची चक्क चपलाचा हार घालून तोंडाला रंग लावत गाढवावरून मिरवणूक काढली जाते. नेमका काय आहे प्रकार जाणून घेण्यासाठी वाचा...
सासरवाडीमध्ये जावयास मोठा मानपान सन्मान मिळतो. पण बीड (Beed) जिल्ह्यात असं एक गाव आहे ज्या गावात जावयाची थेट गाढवावरून धिंड काढली जाते. त्याच्या गळ्यात चप्पलचा हार घालून तोंड काळं करण्यात येते.
बीडच्या विडा (Vida Village Tradition) या गावामध्ये गेल्या आठ दशकांपासून ही परंपरा पाळण्यात येते. होळी आणि रंगपंचमीचा सण या गावामध्ये वेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात येतो. दरवर्षी धुलीवंदच्या (Dhulivandan) दिवशी या गावात जावयाची गाढवावरून धिंड काढली जाते. या परंपरेला ८५ वर्षांचा इतिहास असल्याचं येथील ग्रामस्थ सांगतात.
कशी होते जावयाची निवड ? (How to Select son in law)
धुलीवंदनाच्या अगोदर 8 दिवस या परंपरेसाठी जावईशोध सुरू असतो. या गावातील जावई धुलीवंदनाच्या आधी सासरवाडीकडे येणे टाळतात. आता गावातच अनेक जावई असल्याने ग्रामस्थांचे काम थोडे सोपे झाले आहे.गावातील तरुण मंडळी धुळवडीच्या आधीपासून जावयाचा शोध घेतात आणि यातील एका जावयाचे मन वळवतात. त्यानंतर जावयासाठी चांगल्या गाढवाचा शोध घेण्यात येतो. त्या गाढवावरून जावयाची धिंड काढण्यात येते.
विडा गावात 200 पेक्षा जास्त घर जावई...
या गावात सध्या 200 पेक्षा जास्त जावई वास्तव्यास आहेत काही दिवसापासून या गावात घरजावई करून घेतले जाते. जावयाची बॅन्ड, ढोल ताशे लावून मिरवणूक काढली जाते, संपूर्ण गावभर मिरवणूक काढली जाते, सर्व गावकऱ्यांकडून जावयास मानाचा हनुमान मंदिरात कपड्यांचा आहेर आणि सोन्याची अंगठी सरपंचाच्या हस्ते दिली जाते.
ज्या गावात लग्नादिवशी घोड्यावरून मिरवत नेले जाते त्याच सासुरवाडीत गाढवावरून धिंड काढली जाते. सकाळी नऊच्या सुमारास जावयाला गाढवावर बसवले जाते, त्याच्या गळ्यात खेटरांचा हार घालण्यात येतो. या वरातीपुढे संपूर्ण गाव नाचत असतो. मिरवणूक गावातील सर्व गल्लीबोळातून जाते. घराच्या छतावरून पाणी आणि रंग टाकला जातो. दुपारी मारुतीच्या पारावर जावयाला मानपानाचे कपडे आणि पूर्ण आहेर देऊन त्याचा सत्कार करण्यात येतो. धिंडीत कोणी काही जास्त त्रास दिला असेल, तर शेवटी माफी मागितली जाते. जावईही धिंडीतली थट्टा आणि त्यानंतरचा सत्कार मोठ्या मनाने स्वीकारतो. विड्याच्या या परंपरेचा भाग होण्याची संधी मिळाल्याबदल जावई गावाचे आभार मानतात.
काय आहे परंपरा? (What is tradition of procession of son-in-law on a donkey has been going on)
विडा येथे ८५ वर्षांपूर्वी गावचे जहागीरदार आनंदराव ठाकूर देशमुख यांचे जामाद म्हणजे जावई धुलीवंदनाच्या दिवशी सासुरवाडीला आले होते . त्या दिवशी जावयाची थट्टा मस्करी करण्याचा विचार देशमुख यांच्या मनात आला आणि जावयाची थट्टा करण्यासाठी आनंदराव ठाकूर देशमुख (Anandrao Thakur Deshmukh) यांनी जावयाची गाढवावरून धिंड काढली. त्यांना रंग लावला आणि हे सर्व झाल्यानंतर जावयाचा मानपान केला. ही प्रथा गावकऱ्यानी आजही जपली आहे.