2014 ची लोकसभा निवडणूक सर्वच राजकीय विश्लेषक भारतीय निवडणूक इतिहासात अपवाद मानतात. कारण तेव्हा जे काही घडले ते भारताच्या राजकारणाच्या पठडी विरुद्ध घडले होते. नरेंद्र मोदींचा एकहाती करिष्मा होता. जवळपास 400 सभा देशभरात मोदींनी घेतल्या. भारतीय जनता पक्षाचे पारंपरिक मुद्द्यांव्यतिरिक्त (राम मंदिर, 370, हिंदुत्ववाद) नौकऱ्या, शाश्वत विकास, महागाई, सरंक्षण इत्यादी मुद्दे नरेंद्र मोदींनी सभांमधून मांडले व लोकांनी त्यांना भरभरून मतदान केले. देशभरातून 31% वोट शेअर NDA घेऊ शकली. एकूण स्वप्न खरेदी करण्याचे काम भारतीय जनतेने केले. परंतु त्याचे वास्तविक चित्र पूर्णतः उलट झाले.
1 कोटी नोकऱ्या नोटाबंदी सारखा अत्यंत विचारहीन निर्णय घेतल्याने गेल्या. GST चुकीच्या अंमलबजावणीने पूर्णतः अर्थव्यवस्था कोलमडली दहशतवादी हल्ले झाले. मोदी आणि शहा दोनच माणसे देश चालवायला लागली. नितीन गडकरी वगळता एकाही मंत्र्याला स्वायत्तता नाही. हे स्पष्ट दिसते, एवढा मोठा देश असा चालू शकत नाही. भारतातल्या महत्त्वाच्या संस्था सीबीआय, सुप्रीम कोर्ट, आरबीआय यांच्यात प्रचंड अस्वस्थता दिसली. इतिहासात पहिल्यांदा सुप्रीम कोर्टाच्या न्यायधीशांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन विरोध दर्शवला. आरबीआय चे दोन गव्हर्नर आपला चार्ज सोडून बाजूला झाले. सीबीआय मधला वाद चव्हाट्यावर आला. प्लांनिंग कमिशन च्या जागी नीती आयोग नवीन आला. GOM ग्रुप ऑफ मिनिस्टर संकल्पना मोडीत काढली गेली. (एखाद्या महत्वाच्या विषयात निर्णय घेण्यासाठी GOM पूर्वी फार महत्वाची भूमीका बजावत असे)
गुजरात केडर चे जवळपास 130 आयएएस अधिकारी सर्व मंत्री कार्यालयात नियुक्त केले गेले. ज्यामुळे सर्वमंत्र्यांच्या अधिकारांवर गदा आणली गेली. स्वतःच्याच मंत्र्यांवर एवढा अविश्वास दाखवणारा पंतप्रधान भारतात कधीच झाला नाही. खासदारांना मिळणारी वागणूक देखील अपमानास्पद होती.म्हणूनच काहींनी खासदारकीवर लात मारत राजीनामे दिले. विविधतेने नटलेला हा देश दोन माणसांनी चालवणे अशक्यप्राय आहे. वरील सर्व मुडी कारभाराचा परिणाम अपेक्षित होता. तोच झाला देश विकासात मागे पडला.
काँग्रेसकडे सक्षम पर्याय नाही हेच मोदींच्या विजयाचे कारण आहे. लोकांनी तुम्हाला समोर चांगला पर्याय नाही. म्हणून निवडले होते तुम्ही स्वप्न दाखवली लोकांना भावली पण वास्तवात तुम्ही फेल ठरलात. 2019 ची निवडणूक 2014 च्यामुद्द्यांवरनबोलतालढवलीगेली.नोटाबंदी,जीएसटी,रेरायामुद्द्यांवरएकाहीसभेतमोदीबोललेनाही.भावनिकमुद्देघेऊनपुन्हाएकदालोकांच्याडोळ्यातधूळफेकचकेली.शेवटीस्वतःचीजातदेखीलमोदींनाआठवली.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची राष्ट्रवादी विचारधारा वरील कार्यपद्धतीच्या विरोधात आहे.संघातील अनेकांना मोदींची कार्यपद्धती आवडली नाही. त्याचा झटका संघचालक मोहनजी भागवतांनी बिहार विधानसभा निवडणुकीत दिला होता.तो खरंतर मोदी शहांना इशारा होता.तोत्यांना समजलानाही. चक्क सुप्रीम कोर्टाच्या विरोधात जाऊन अट्रोसिटी कायद्यावर मोदींनी अध्यादेश आणला. ज्याचा परिणाम पुढे तीन राज्यात झालेल्या निवडणुकीत दिसला. तरी ही मोदी शहांचे डोळे उघडले नाही. पराभवाला सामोरे जावे लागले.तेच आरक्षणाच्या बाबतीत देखील घडत आहे. मोदी आरक्षणाच्या विळख्यातून खुल्या घटकाला बाहेर काढतील ही आशा होती. मोदींनी खुल्या गटाला संविधान बाह्य दहा टक्के आरक्षण देऊन हा पेच पुन्हा अधिक क्लिष्टच केला. आरक्षण संपवण्याची गरज असताना खुल्या गटाला आरक्षण देऊन समस्या सुटेल असे मुळीच वाटत नाही. उलट अनेक बाबी पुढच्या काळात अजून अडचणी वाढतील वर्ग द्वेष,जातीय द्वेष वाढवतील हे मात्र नक्की.
मी NDA चा मतदार आहे काँग्रेसने स्वतःच्या कर्माने ही वेळ त्यांच्यावर आणली आहे. म्हणूनच ‘दगडापेक्षा वीट मऊ’ या न्यायाने तुम्ही सत्तेत आहात हे विसरणारा माणूस पंतप्रधान व्हावा असे वाटत नाही. NDA ची सत्ता यावी संपूर्ण देशाचा विचार करणारा सामूहिकने कृतृत्वावर विश्वास असणारा देशाला प्रगती पथावर नेणारा पंतप्रधान असावा ही भाजप मतदार म्हणून माझी प्रामाणिक अपेक्षा आहे.