राज्यसभा निवडणूक : महाविकास आघाडीला धक्का, अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना मतदानाची परवानगी नाही

राज्यसभा निवडणूकीत मतदानाची आकडेवारी 50 टक्क्यांच्या वर गेली आहे. मात्र नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांना मतदान करण्याची परवानगी मिळाली नसल्याने हा महाविकास आघाडीसाठी मोठा धक्का मानला जात आहे.;

Update: 2022-06-10 07:37 GMT

राज्यात राज्यसभेच्या सहा जागांसाठी मतदान सुरू आहे. विविध पक्ष आपल्या आमदारांना बसमधून सुरक्षितरित्या विधानभवनच्या आवारात दाखल झाले आहेत. तर 50 टक्के आमदारांनी मतदानाचा अधिकार बजावला आहे. दरम्यान नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांना मतदानाची परवानगी नाकारल्याने त्यांना मतदानापासून वंचित रहावे लागणार आहे. त्यामुळे महाविकास आघाडीला हा मोठा धक्का मानला जात आहे.

राज्यसभेच्या सहा जागांसाठी राज्यात सात उमेदवार आहेत. त्यामध्ये भाजपचे तीन, राष्ट्रवादी एक, शिवसेना दोन आणि काँग्रेसचा एक उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात आहेत. तर विधानभवनात या सहा जागांसाठी मतदान सुरू असून 50 टक्के आमदारांनी मतदान केले आहे. दरम्यान उच्च न्यायालयाने अनिल देशमुख यांच्या जामीनावर सुनावणी घेण्यास नकार दिला आहे. तर नवाब मलिक यांची याचिका चुकीची असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे हा महाविकास आघाडीला मोठा धक्का मानला जात आहे.

राज्यसभा निवडणूकीत मतदान करण्यासाठी एक दिवसाचा जामीन मिळावा यासाठी अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांनी मुंबई सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला होता. मात्र मुंबई सत्र न्यायालयाने अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांचा जामीन अर्ज फेटाळला होता. त्यामुळे अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र उच्च न्यायालयातही नवाब मलिक यांची याचिका चुकीची ठरवत तर अनिल देशमुख यांच्या जामीनावर सुनावणी घेण्यास नकार दिला. त्यामुळे अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना राज्यसभेच्या निवडणूकीत मतदानापासून वंचित रहावे लागणार आहे. तर हा महाविकास आघाडीला मोठा धक्का मानला जात आहे.

Full View

Tags:    

Similar News