बाळासाहेब थोरात यांचा काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा- सूत्र

Update: 2021-01-04 06:53 GMT

बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. थोरात सध्या दिल्लीमध्ये आहेत. काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांच्या गाठीभेटी घेतल्यानंतर थोरात यांनी राजीनामा दिल्याची माहिती मिळतेय. बाळासाहेब थोरात यांच्य़ाकडे प्रदेशाध्यक्षपद, महसूलमंत्री पद आणि विधिमंडळ नेतेपद ही तिन्ही पदं होती. तसेच त्य़ांचे भाचे सत्यजीत तांबे यांच्याकडे युवक काँग्रेसचे अध्यक्षपद असल्याने काँग्रेसमधील एका गटाने याबाबतची तक्रार दिल्लीत वरिष्ठांकडे केल्याची चर्चा होती. तर दुसरीकडे काँग्रेसमध्ये होत असलेल्या संघटनात्मक बदलांच्या पार्श्वभूमीवर थोरात यांनी स्वत:च राजीनामा देण्याची तयारी दाखवल्याची चर्चा आहे. ता थोरात यांच्यानंतर काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार ते पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. 

Similar News