पर्यावरणाच्या मुद्द्यावर आवाज उठवणाऱ्या तीन वेबसाईट बंद, आरेच्या वेबसाईटचाही समावेश
पर्यावरणाच्या मुद्द्यावर (environmental issues) विविध विषयावर आवाज उठवणाऱ्या तीन वेबसाईट केंद्र सरकारने अचानक बंद केल्या आहेत. विशेष बाब म्हणजे या वेबसाइट चालवणाऱ्या कोणत्याही व्यक्तीशी सरकारने या संदर्भात कुठलाही संपर्क साधलेला नाही.
त्यामुळे वेबसाईट चालवणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला सरकारने या वेबसाईट का बंद केल्या? हे देखील माहित नाही.
गेल्या काही दिवसांपासून या वेबसाईट EIA ड्राफ्ट वर प्रश्न उपस्थित करत होत्या.
देशभरात हज़ारों लोक पर्यावरण मंत्रालयाच्या EIA च्या विरोधात आवाज उठवत आहेत. त्यांच्या मते EIA च्या ड्राफ्ट मध्ये पर्यावरणाकडे दुर्लक्ष करून विकासाला जास्त महत्त्व दिले आहे.
मात्र, या ड्राफ्ट चा कोरोनाच्या काळातही वेबसाईट वरून विरोध केला जात असताना अशा पद्धतीने त्या वेबसाईट बंद झाल्याने पर्यावरप्रेमींनी केंद्रसरकरचा निषेध केला आहे.
'या' वेबसाईट वर बंदी
[gallery data-size="medium" td_select_gallery_slide="slide" columns="1" ids="92671,92672,92673"]
let India breathe,
Fridays for Future
आणि There is no earth B
या वेबाईट अचानक बंद झाल्या आहेत.
friday for future ने या संदर्भात बोलताना
आम्ही इंटरनेट फ्रीडम मूवमेंट मध्ये यासंदर्भात तक्रार दाखल केल्याचे सांगितले. मात्र, वेबसाईट का बंद केल्या हे सांगितलं नाही.