कोरोनाचा संसर्ग आणखी वाढू नये यासाठी मुंबईतील लोकल वाहतूक सेवा सर्वसामान्यांसाठी गेल्या चार महिन्यांपासून बंद आहे.
सध्या फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी लोकल वाहतूक सुरू करण्यात आली आहे. पण बुधवारी नालासोपारा इथं बस न मिळाल्याने संतप्त झालेल्या सुमारे 200 लोकांनी थेट रेल्वे स्टेशनमध्ये घुसून सर्वसामान्यांसाठी लोकल वाहतूक सुरू करण्याची मागणी केली. यावेळी काही काळ तणाव निर्माण झाला होता.
लोकांची मागणी योग्य असली तरी लोकलमधली गर्दी पाहता सोशल डिस्टन्सिंग पाळले जाणे शक्य नसल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटले आहे.
हे ही वाचा..
प्लाझ्मा थेरपीच्या नावाने लोकांची फसवणूक, कारवाईचा इशारा
#कोरोनाशी_लढा – होमिओपॅथी,आयुर्वेद, युनानी औषधांबाबत मुख्यमंत्र्यांच्या सूचना
सर्वसामान्यांसाठी लोकल सुरू केल्या तर लोकलमध्ये होणारी गर्दी पाहता सोशल डिस्टन्सिंग अशक्य आहे, त्यामुळे सध्या तरी लोकल सेवेला सुरूवात करता येणार नाही, असे टोपे यांनी म्हटले आहे. नागरिकांनी कायदा हातात घेऊ नये असे आवाहनही टोपे यांनी केले आहे. तसंच लोकल सुरू करण्याबाबत मुख्यमंत्री योग्यवेळी निर्णय घेतील अशी माहितीही त्यांनी दिली.