मराठा आरक्षण: मुख्यमंत्र्यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन…
Maratha reservation: CM Uddhav thackeray calls Devendra Fadnavis
मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर आज उद्धव ठाकरे यांनी फेसबुकद्वारे जनतेशी संवाद साधताना या संदर्भात जनतेला माहिती दिली. मराठा आरक्षणासंदर्भात सरकार सर्व पक्षासोबत चर्चा करत आहे.
विधीतज्ञांशी चर्चा करत आहे. कोणीही या संदर्भात गैरसमज पसरु नये. असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी जनतेला केलं. तसंच मराठा आरक्षणासंदर्भात विरोधी पक्ष देखील आपल्या सोबत आहे. हे सांगताना मुख्यमंत्र्यांनी आपण या संदर्भात देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली. ते बिहारच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी मराठा आरक्षणासंदर्भात आपला सरकारला पाठींबा असल्याचं सांगितलं. फोनवरुन सांगितल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.