राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचा राजीनामा देऊन उदयनराजे भोसले यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांच्या विरोधात खासदारकीला राष्ट्रवादी कोण उमेदवार देणार? असा प्रश्न राजकीय वर्तुळात चर्चेला जात होता. मात्र, आता सातारा लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून श्रीनिवास पाटील यांची उमेदवारी निश्चित केली असल्याचं समजतंय.
दरम्यान श्रीनिवास पाटील यांचं सातारा जिल्ह्यात मोठं प्रस्थ असून उदयनराजे यांच्यासमोर हे मोठं आव्हान ठरणार असल्याचं बोललं जात आहे.
कोण आहेत श्रीनिवास पाटील?
श्रीनिवास पाटील यांनी आयएएस (भारतीय प्रशासकीय सेवा) अधिकारी होते.
शरद पवारांनी श्रीनिवास पाटील यांना राजकारणात आणलं.
शरद पवार यांचे निकटवर्तीय म्हणून श्रीनिवास पाटील यांची ओळख.
श्रीनिवास पाटील हे 1999 ते 2004 आणि 2004 ते 2009 या काळात लोकसभा खासदार होते.
श्रीनिवास पाटील दोन वेळा जुन्या कराड लोकसभा मतदारसंघातून खासदार होते.
1 जुलै 2013 ते 26 ऑगस्ट 2018 या काळात त्यांनी सिक्कीमचे राज्यपाल म्हणून काम पाहिलं.
राज्यपालपदाची कारकीर्द संपल्यानंतर पुन्हा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षासाठी काम सुरु.