निवडणूकांच्या दरम्यान पसरवण्यात येणाऱ्या खोट्या बातम्या, अफवांवर नियंत्रण आणण्यासाठी WhatsApp ने नवीन टूल विकसित केलं आहे. WhatsApp Fact-checking सेवा भारतात लाँच करत असल्याचं कंपनीने सांगीतलं आहे. Checkpoint Tipline असं या सेवेचं नाव असून यासाठी व्हॉटसऍपने भारतातल्या दोन स्टार्ट अप कंपन्यांसोबत करार केले आहेत. 919643000888 या क्रमांकावर तुम्ही फोटो, व्हिडीयो किंवा मजकूर पाठवू शकता. इंग्रजी, हिंदी, तेलगू, बंगाली आणि मल्याळम अशा भाषांमध्ये सध्या ही सेवा उपलब्ध आहे