मराठीत बनवा बनवी बनलाच नसता तर मीम इंडस्ट्रीचं काय झालं असतं?

सध्या समाजमाध्यमांमध्ये मीम्सचा ट्रेंड सुरू आहे. एकही गोष्ट अशी नाही की ज्यावर मीम्स बनत नसतील. त्यातल्या त्यात मराठीत देखील मीम्स बनु लागले. अनेक वेगवेगळ्या विषयांवर मीम्स तयार होउ लागले. पण मराठीत आता पर्यंत जितके मीम्स बनले असतील त्यात ६० टक्के मीम्स बनवण्यासाठी सर्वकालिन प्रसिध्द चित्रपट अशी ही बनवा बनवी ची दृश्य वापरली जातात.;

Update: 2022-09-24 04:41 GMT

आपल्याला मागच्या महिन्यात कोणता सिनेमा चित्रपट गृहात लागला हे माहित नसतं आणि ३४ वर्षांपुर्वी आलेला अशी ही बनवा बनवी चित्रपट अजुनही लोकांच्या लक्षात राहिला आहे. विशेष म्हणजे नव्या पिढीला देखील हा चित्रपट आपलासा वाटतोय हे विशेष. त्यामुळेच की काय आत्ताच्या पिढीने या चित्रपटाच्या दृश्यांचा वापर मिम्स बनवण्यासाठी केला. पण त्याचं प्रमाण इतकं वाढलं आहे की अनेकदा प्रश्न पडू लागतो जर हा चित्रपटच आला नसता तर मराठी मीम् इंड्ट्रीचं काय झालं असतं?

२३ सप्टेंबर ला अशी ही बनवा बनवी चित्रपट येऊन ३४ वर्षे झाली. त्याबद्दल चित्रपटाती प्रमुख भुमिका साकरलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री अश्विनी भावे यांनी याबद्दल प्रेक्षकांचे ट्विट करून आभार मानले आहेत. तेव्हा देखील त्यांनी मीमच्या पध्दतीने एडीट केलेला व्हिडीओच त्यांनी पोस्ट केला आहे. त्यांच्या या ट्विटवर मॅक्स महाराष्ट्रचे संपादक रविंद्र आंबेकर यांनी जर हा चित्रपट नसता तर मीम्स ची इंडस्ट्री उध्वस्त झाली असती प्रतिक्रीया दिली आहे.

जे प्रतिक्रीया रविंद्र आंबेकर यांनी दिली आहे त्यामागे उदाहरण म्हणुन एक मीम देखील पाहुयात जे निवडणुक आयोगाने तयार केलं आहे. म्हणजे शासन, प्रशासन, शासकीय यंत्रणा देखील या चित्रपटाच्या मोहातून सुटलेले नाहीत. निवडणुक आयोगाने "मनावर घ्या चला जबाबदारी पार पाडू या मतदार ओळखपत्रासोबत आधार कार्ड आजच जोडू या."

हे एकच मीम झालं. असे अनेक मीम आपल्याला सोशल मिडीयावर पाहायला मिळतात. बनवा बनवी वर मिम्स होतात किंवा त्याचा वापर मिम्स बद्दल केला जातो ही चांगलीच गोष्ट आहे. त्याचा फायदा जर मराठी कलाकारांना होत असेल तर सोन्याहुन पिवळं!

Tags:    

Similar News