दोन दिवसांपूर्वी भाजपचे खासदार सुजय विखे-पाटील यांनी कर्जत येथील प्रचार सभेमध्ये केलेल्या वक्तव्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापजनक वातावरण निर्माण झाले आहे. ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांच्या खात्यात भरलेले दोन हजार रुपये चालतात, तर मग त्यांचे कमळ का चालत नाही,’ असं त्यांनी म्हटलं होत.
या वक्तव्यानंतर नगर जिल्ह्यात सुजय विखे यांच्या विरोधात लिहलेलं एक पत्र चांगलच व्हायरल झालं आहे. या पत्रात सुजय विखे-पाटील यांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध करून २००० रुपये रकमेचा चेक जोडण्यात आलाय. सोबतच भाजपला मत न देण्याचं आवाहनही करण्यात आलं आहे.
"दोन हज़ार रुपयात शेतकऱ्यांच्या मताची किंमत करु पाहणारे सुजय विखेंचे वडील राधाकृष्ण विखे, ज्यांच्यासाठी मतांचा जोगवा मागताना सुजय विखे यांनी नैतिकता बाजूला ठेवली ते राम शिंदे आणि ज्या पक्षाकडून निवडणूक लढवत आहेत त्या भाजप पक्षाला मतदान करू नये." असं आवाहन शेतकऱ्यांना या पत्राद्वारे करण्यात आले आहे.