'मी माझी चूक सुधारेन, पक्षाने आपली चूक सुधारावी'- विनोद तावडे

Update: 2019-10-04 06:17 GMT

विनोद तावडे यांचं भाजप पक्षाच्या चौथ्या उमेदवार यादीतही नाव न आल्याने पक्षावर नाराजी असल्याच्या चर्चा होत असल्यामुळे त्यांनी आज मुंबई येथे पत्रकार परिषद आयोजित केली होती. पत्रकार परिषदेत बोलताना माझी काही चूक झाली असल्यास मी सुधारेन आणि पक्षाची काही चूक असल्यास पक्ष सुधारेल. मी पक्षाचा एकनिष्ठ कार्याकर्ता असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

विनोद तावडे यांनी पत्रकार परिषदेत पक्षाने मला तिकीट का दिले नाही याचे आत्मपरीक्षण करत असून आता फार विचार करत बसण्याची गरज नसल्याचे म्हटले आहे. सोबतच पक्ष जी जबाबदारी देईल ती पुढे पार पाडणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. पाहा व्हिडीओ...

https://youtu.be/kJ-5owteZvw

 

Similar News