कोरोना संकटाच्या धास्तीनं पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्याकडून भारत दौरा रद्द
कोरोनाचा नवा स्ट्रेन आणि वाढता संसर्ग पाहून ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी त्यांचा भारत दौरा रद्द केला आहे. ब्रिटनमधे करोनाचा नवा स्ट्रेन वेगाने फैलावत आहे. स्वदेशातील या गंभीर परिस्थितीमुळे बोरिस जॉन्सन यांनी भारत दौरा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.;
६ जानेवारीला प्रजासत्ताक दिनाला प्रमुख पाहुणे म्हणून त्यांना निमंत्रित करण्यात आले होते. त्यांनी निमंत्रण सुद्धा स्वीकारले होते. "बोरिस जॉन्सन यांनी आज सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदींबरोबर फोनवरुन चर्चा केली. महिनाअखेरीस भारत दौऱ्यावर उपस्थित राहता येणार नसल्याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली" असे डाऊनिंग स्ट्रीटवरील प्रवक्त्याने सांगितले.
"करोना व्हायरसचा नवा स्ट्रेन वेगाने फैलावत असल्यामुळे काल रात्री ब्रिटनमध्ये पुन्हा एकदा देशव्यापी लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे. व्हायरसमुळे निर्माण होणारी परिस्थिती हाताळण्यासाठी यूकेमध्येच थांबणे आवश्यक आहे" असे जॉन्सन यांनी पंतप्रधान मोदींना सांगितले. कॉंग्रेसकड़ून यापूर्वीच पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांचा दौरा रद्द करण्याची मागणी करण्यात आली होती. आता प्रजासत्ताक दिनाचे संचलनही स्थगित करण्याची विरोधकांची मागणी आहे.