आजपासून राज्यात ठाकरे सरकार येणार आहे. उध्दव ठाकरे आज हे शिवतीर्थावर मुख्यमंत्रीपदाची शपथ घेत आहेत. दुसरीकडे उद्धव यांचे पुतणे आणि राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरे आज सकाळी कामगारांच्या आंदोलनात दिसले.
हे ही वाचा
काय आहे महाविकास आघाडीचा ‘कॉंमन मिनिमम प्रोग्राम’?
आदर्श’घोटाळ्याची फाईल उघडली, अशोक चव्हाण मंत्री पदाला मुकणार?
दहशतवादी प्रज्ञा ने दहशतवादी गोडसेला देशभक्त बनवलं – राहुल गांधी
आज सकाळी नवी मुंबईत मनसे शहरप्रमुख गजानन काळे यांनी थाळीनाद महामोर्चाचं आयोजन केलं. या मोर्चात नवी मुंबई आणि परिसरातील कामगार मोठ्. संख्येने सहभागी झाले होते. अमित ठाकरे यांनी या मोर्चात सहभाग घेतला. सीवुड्स रेल्वे स्टेशन ते नवी मुंबई मनपा मुख्यालय पर्यंत हा थाळीनाद मोर्चा काढण्यात आला.
६,५०० कंत्राटी कामगारांचे थकीत किमान वेतनाचे ९० कोटी रुपये तात्काळ द्यावे ही कामगारांची प्रमुख मागणी होती. या मागणीचं निवेदन नवी मुंबई आयुक्त आण्णासाहेब मिसाळ यांना देण्यात आलं. मोर्च्यानंतर अमित ठाकरे आणि आयुक्त यांच्यात चर्चा झाली. ३ आठवड्यात कामगारांचे थकीत वेतन दिलं जाईल असं लेखी आश्वासन आंदोलनकर्त्यांना देण्यात आलं.