पुणे जिल्ह्यातील पर्यटनस्थळांवर पर्यटकांची गर्दी ; कोरोना नियमांचे उल्लंघन

कोरोनाच्या पार्श्वभुमीवर राज्यातील पर्यटनस्थळांवर पर्यटकांना बंदी असतांना देखील पुणे जिल्ह्यातील पर्यटनस्थळांवर पर्यटकांची गर्दी होतांना दिसत आहे. यावेळी कोरोना नियमांचे उल्लंघन होताना पाहायला मिळत आहे.;

Update: 2021-08-05 10:15 GMT

 कोरोनाच्या पार्श्वभुमीवर राज्यातील पर्यटनस्थळांवर पर्यटकांना बंदी असतांना देखील पुणे जिल्ह्यातील भिमाशंकर, नाणेघाट, माळशेज या भागात पर्यटकांची मोठी गर्दी होतांना दिसत आहे. सह्याद्रीच्या कुशीतील या निर्सगाचा हिरवा शालू परिधान केलेल्या पर्यटनस्थळाची भुरळ नक्कीच पर्यटकांना घातली आहे. मात्र, कोरोनाला रोखण्यासाठी शासनाने या ठिकाणी येण्यासाठी बंदी घातली आहे. तरी देखील पर्यटक शासनाच्या आदेशाला केराची टोपली दाखवत या भागात गर्दी करतांना दिसत आहेत.

पुणे जिल्ह्यातील भिमाशंकर आणि जुन्नर तालुक्यातील माळशेज, नाणेघाट परिसरात प्रामुख्याने पर्यटकांची गर्दी होतांना दिसत आहे. पावसाच्या सरीसोबत पांढरेशुभ्र धुके, खळखळ धबधबे अशा निसर्गाच्या देखणे रूप पाहण्यासाठी पर्यटकांची येथे मांदियाळी पाहायला मिळत आहे. पुणे, मुंबईसह परिसरातील पर्यटक आपल्या कुटुंबासह येथे पर्यटनासाठी येत असतात. कोरोनाच्या पार्श्वभुमीवर मागील दोन वर्षांपासून करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे लोक घरातच आहेत. त्यामुळे चिमुकल्यांस घरातील महिला आणि वृध्दांचा ओढा हा नयनरम्य निसर्गाकडे दिसतो.मात्र, पर्यटन करतांना बरेच पर्यटक कोरोनाच्या नियमांचे पालन करतांना दिसत नाही. त्यामुळे कोरोना संसर्ग वाढण्याचा धोका लक्षात घेता संबधित प्रशासनाने या पर्यटन स्थळांवर योग्य उपाययोजना करण्याची मागणी होतांना दिसत आहे.

Tags:    

Similar News