भाजप नेते एकनाथ खडसेंच तिकीट कापल्यात जमा आहे. तर दुसरीकडे खडसेंचे राजकीय वैरी असलेले गिरीश महाजन तसंच शिवसेनेचे गुलाबराव पाटील हे आज शक्ती प्रदर्शन करत अर्ज दाखल करणार आहेत. गिरीश महाजन जामनेर मतदार संघातून अर्ज दाखल करणार असून 1 लाखाहून अधिक समर्थक अर्ज दाखल करण्यासाठी येणार असल्यान जय्यत तयारी आलीय. महाजन राज्यभर प्रचार दौरा करणार असल्याने मतदार संघात वेळ मिळणार नाही. त्यामुळे ते आजच स्वतःच्या मतदार संघातील काम आटोपून घेणार आहेत.
एकनाथ खडसेंना मात्र, अजून ही शेवटच्या यादीत नाव येण्याबाबत आशा असली तरी खडसेंना तिकीट मिळणार नाही असंच चित्र आहे.
खडसेंच बंड शांत करण्यासाठी कन्या रोहिणी खडसे यांना मुक्ताईनगर च तिकीट मिळण्याची श्यक्यता वर्तवली जात असली तरी खडसेंच एकेकाळचे पीए (PA) असलेले माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अशोक कांडेलकर, नंदकुमार महाजन यांचं नाव चर्चेत आहेत. उद्या अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असल्याने खडसेंसाठी आज चा दिवस महत्वाचा आहे. खडसेंनी अपक्ष निवडणूक लढवावी अशी मागणी समर्थकांनी केलीय. खडसेंनी सून खासदार रक्षा खडसेंनी मुंबई गाठून प्रदेशाध्येक्ष चंद्रकांत पाटील यांची भेट घेतली. मात्र, तिकीटाबाबत ठोस असं काही हाती लागलं नाही. विशेष म्हणजे या मतदार संघात राष्ट्रवादीनं अजूनही उमेदवार जाहीर केला नाही . आज खडसे काय भूमिका घेतात याकडे आता संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.
काल पासून खडसे मुक्ताईनगरच्या फार्म हाऊस मध्ये असून कार्यकर्त्यांचा भेटी घेत आहेत. तर दुसरीकडे शिवसेना भाजप युतीच्या नेते अर्ज दाखल करण्यासाठी शक्तिप्रदर्शन दाखवण्याच्या तयारीत आहेत.
जळगाव ग्रामीण मधून शिवसेनेचे गुलाबराव पाटील हे आज अर्ज दाखल करत आहेत. जळगाव शहर येथील भाजपतर्फे सुरेश भोळे, यांचा अर्ज दाखल करणार आहेत. यावेळी महाजन गुलाबराव पाटील एकत्र येणार आहेत. पारोळा एरंडोल मधून राष्ट्रवादीचे डॉ सतीश पाटील तसंच शिवसेनेचे चिमणराव पाटील ही अर्ज दाखल करत आहे.