महात्मा जोतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्ताने देशात टीका महोत्सवाला सुरुवात, लसीकरण करताना 'या' ४ बाबींवर ध्यान दया, मोदींचं देशवासियांना आवाहन आजपासून देशात टीका महोत्सवाला सुरुवात झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टीका महोत्सवाची घोषणा केली आहे. ११ एप्रिल हा थोर समाजसेवक महात्मा जोतिबा फुले यांचा जन्मदिन त्या निमित्ताने मोदी यांनी आजपासून देशात टीका महोत्सवाची घोषणा केली आहे. हा टीका महोत्सव भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनापर्यंत (१४ एप्रिल) सुरु असणार आहे.
मोदींनी या संदर्भात एक पत्र जारी केलं आहे. त्या पत्रात ही कोरोना विरोधातील दुसरी लढाई असल्याचं म्हटलं आहे.
यामध्ये मोदींनी चार बाबींवर भर देण्यास सांगितलं आहे. Each one Vaccinate one
जी माणसं लसीकरणाला जाऊ शकत नाही. त्या माणसांना मदत करा.
Each one Treat One
ज्यांच्याकडे लसीकरणाला जाण्यासाठी साधन नाहीत. ज्यांना लसीकरणाबाबत माहिती नाही अशा लोकांना लसीकरण केंद्रावर जाण्यासाठी मदत करा.
Each one Save one
मी स्वतः मास्क वापरेल आणि दुसऱ्यांनाही मी मास्क वापरल्यानं सुरक्षित करेल
Micro Contentment zone
आणि चौथी महत्त्वाची बाब म्हणजे ज्या भागात कोरोनाचे रग्ण आढळले आहेत. त्या ठिकाणी Micro Contentment zone तयार करा. असं मोदींनी या पत्रात म्हटलं आहे.