दसऱ्याचं निमित्त साधून जळगाव जिल्ह्यातील पारोळा येथे राष्ट्रवादीच्या प्रचाराचा मुहूर्त शरद पवार यांनी केला आहे. पवारांचं भाषण संपल्यावर खाली बसलेल्या शेतकऱ्यांनी कर्जमाफी बाबत विचारलं असता पवार यांनी 'आपलं सरकार आल्यावर सरसकट कर्ज माफी देऊ, हे सरकार देणार नाही' असं शेतकऱ्यांना आश्वस्त केलं आहे.
यावेळी पवार यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर टीका केली. मी मुख्यमंत्री असतांना रोज दोन तास उदयोग वाढीसाठी देशविदेशातील उद्योजकांना भेटायचो, आजच्या मुख्यमंत्र्यांना वेळ नाही, आज राज्यात नवीन उद्योग नाही, उद्योग नाही म्हणून तरुण मोठया प्रमाणावर बेरोजगार झाल्याची टीका शरद पवार यांनी केली आहे.
नवीन उद्योगासाठी सरकारचं धोरण नाही, शेतकऱ्यांसाठी धोरण नाही, महिलांसाठी धोरण नाही, केंद्र आणि राज्य सरकार फक्त विरोधकांना अडचणीत आणून तुरुंगात टाकण्याचं काम भाजप सरकार करत.
"मला 'ईडी की फीडी माहीत नव्हतं फक्त येडी' हे माहीत होतं या ईडी न चिदंबरम, यांना तुरुंगात टाकलं, मलाही टाकण्याचा प्रयत्न केला, मात्र माझा कवडीचा संबंध नसतांना चौकशी करण्याचा प्रयत्न केला, पण या सरकारला त्यांची जागा दाखवून देऊ" असं आव्हान पवार यांनी केलं आहे. ईडी फीडी काहीही येवो आपण एक राहिलो तर आपण आपलं सरकार येईल असंही ते म्हणाले.