....तर राष्ट्रवादीला होणार डबल फायदा

Update: 2019-11-19 06:29 GMT

राज्यातला सत्ता स्थापनेचा पेच सुटता सुटत नाहीय. भाजपाने ५०-५० च्या वाटाघाटीला नकार दिल्यामुळे शिवसेना कॉँग्रेस राष्ट्रवादीसोबत जाईल असं चित्र दिसत असतांना आता भाजप राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाल्या आहेत.

सत्ता उपभोगण्यासाठी भाजपाकडे बी प्लॅन आहे, असे भाजपाचे नेते ठनकाउन सांगातात. नंरेद्र मोदी यांनी अधीवेशनाच्या पहील्या दिवशी बिजु जनता दल आणि राष्ट्रवादी कॉँग्रेसचे गुणगान गायले. आणि त्याचबरोबर भाजपानं या पक्षाकडून शिकावं असही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगीतले. भाजपाकडे १०५ जागा तर राष्ट्रवादीकडे ५४ जागा आहेत. तसचं अपक्ष १४ आमदारांचा भाजपाला पाठींबा आहे. या सर्वांच्या जागा मिळुन १७३ जागा होत आहेत.

राष्ट्रवादी सरकार मध्ये सहभागी झाली नाही, तरी भाजपाला विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी अनुपस्थित राहून मदत करु शकते. राष्टवादीचे ५४ सदस्य अनुपस्थित राहिल्यास सभागृहात २३४ सदस्य उरतात. अशा वेळी बहुमतासाठी भाजपला ११७ आमदारांची गरज असेल आणि भाजपकडे ११९ आमदार आहेत. त्यामुळे सरकार विश्वासदर्शक ठराव जिंकू शकेल. असं झाल्यास राष्ट्रवादीला प्रमुख मंत्रिपदे दिली जाऊ शकतात.

Similar News