मोदी पहाटेच गुरुद्वारा दर्शनाला

दिल्लीतील शेतकरी आंदोलन जोरात असताना आज पहाटेच पंतप्रधान मोदींची दिल्लीतील गुरुद्वाराला आश्चर्यकारक भेट देत रकाबगंज गुरुद्वारात माथा टेकत गुरु तेगबहादूर यांना वंदन केलं आहे.;

Update: 2020-12-20 06:04 GMT

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रकाबगंज गुरुद्वारात माथा टेकत गुरु तेगबहादूर यांना नमन केलं. रायसीना हिल्सच्या मागच्या बाजुला स्थित असणाऱ्या या गुरुद्वारामध्ये गेल्या २५ दिवसांपासून 'शीख समागम' सुरू होता.


विशेष म्हणजे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या दौऱ्यादरम्यान व्हीआयपी सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली नव्हती. तसंच सामान्य जनतेला रोखण्यासाठी पोलिसांकडून कोणत्याही पद्धतीचा बंदोबस्त किंवा ट्राफीक बॅरियर देखील लावण्यात आले नव्हते. शेतकरी आंदोलनात प्रामुख्यानं शीख शेतकऱ्यांचा सहभाग आहे. हे आंदोलन काही केल्या थांबत नसताना मोदींच्या गुरुद्वारावर भेटीसाठी तर्कवितर्क केले जात आहेत.


Tags:    

Similar News