महाराष्ट्र राज्य देशात पहिल्या क्रमांकावर असल्याचं सरकार सांगत आहे. मात्र, खरचं असं आहे का? राज्याच्या आर्थिक स्थितीचं वास्तव काय आहे? सरकारने उभं केलेलं आभासी प्रगतीचं चित्र आणि राज्य आर्थिक अहवालामध्ये नोंद केलेले गंभीर आकडे यात तफावत का आहे?
आज महाराष्ट्र राज्यात मतदानाचा महत्त्वपुर्ण दिवस आहे. प्रत्येक नागरिकाने मतदान करताना आपल्या प्रतिनीधींची योग्य पारख करुनच आपल मत द्यावं. सर्व सामान्यांचे प्रश्न सभागृहात प्रभावीपणे मांडुन ते सोडवण्यासाठी तो उमेदवार सक्षम आहे का? याची खात्री करुनच आपलं मत द्यावं.
आपल्या समोर उभ्या असलेल्या आर्थिक संकटावर मात करण्यासाठी योग्य सरकार सत्तेत असणं गरजेच आहे. यापुर्वी आपल्याला या संकटाची जाणिव आहे का? हाच प्रश्न मुळात निर्माण होतो. आपलं अमुल्य मत देण्यापुर्वी राज्याच्या एकुण परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी नक्की पाहा हा व्हिडीओ..
Full View