महाराष्ट्र विधानसभेचा निकाल जाहीर होऊन बरेच दिवस उलटले तरीही भाजप शिवसेनेचा सत्ता वाटपाचा तिढा सुटता सुटत नाही. महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाल्या नंतरही भाजपा आणि शिवसेनेमध्ये चढाओढ चालु आहे.
भाजपानं (BJP) शिवसेनेला (Shivsena) झुकते माप देण्यास नकार दिल्यानं शिवसेनाही प्रंचड आक्रमक झालीय. त्यामुळे संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मुंख्यमंत्री आमचाचं होणार, हे लिहून घ्या. असं म्हणतं भाजपाला आडे हात घेतलं आहे.
"जनतेसमोर जो फॉर्म्युला ठरला होता त्यानुसार भाजपने निर्णय घ्यावा. महाराष्ट्राला स्थिर सरकार देण्यासाठी आम्ही सक्षम आहोत आणि त्यासाठी आम्ही बहुमत सिद्ध करु" असं आव्हानही शिवसेना नेते संजय राऊत यांनी केलं आहे.