‘’छत्री उडाली, कमळे बुडाली जनता झाली धन्य धन्य !’’

Update: 2019-04-08 06:25 GMT

आज मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी एक फोटो ट्विट केला आहे.

दि.8 जून 1980

‘’छत्री उडाली, कमळे बुडाली जनता झाली धन्य धन्य !’’

असं शिर्षक असलेला मार्मिकच्या अंकाचा हा फोटो ट्विट केला आहे. 1980 मध्ये आणीबाणीनंतर राज्यात झालेल्या विधानसभा निवडणूकीत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी कॉंग्रेसला पाठींबा दिला होता. याची आठवण करुन देत राज यांनी निवडणूका न लढवता कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीला दिलेल्या अप्रत्यक्ष पाठींब्याचे त्या घटनेशी संबंध जोडून समर्थन केले आहे.. विशेष म्हणजे या फोटोला कॅप्शन देताना संदीप देशपांडे यांनी माझ्या सर्व शिवसैनिक मित्रांसाठी असं कॅप्शन दिलं असून राज यांनी देखील बाळासाहेबांप्रमाणे ही कृती केली असल्याचं सांगितलं आहे.

 

Similar News