सचिन वाझे यांची अखेर क्राईम ब्रँच मधून उचलबांगडी: गृहमंत्री अनिल देशमुख यांची घोषणा

Update: 2021-03-10 06:53 GMT

सचिन वाझे असो वा कुणीही, शासन कुणाला पाठीशी घालणार नाही. विरोधकांनी त्यांच्याकडील पुरावे एटीएसला द्यावेत, तसेच सचिन वाझे यांची बदली करण्यात येत असल्याची घोषणा राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुखांनी विधानपरिषदेत केली आहे. मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणावरुन विधानसभा विरोधी पक्षतेने देवेंद्र फडणवीस यांनी काल एन्काऊंटर स्पेशलिस्ट सचिन वाझे यांच्यावर गंभीर आरोप केले होते.

संपूर्ण परिस्थिती पाहता माझ्या पतीचा खून झाला असावा. अशी खात्री आहे. सदरचा खून सचिन वाझे यांनी केला असावा. असा माझा संशय आहे. त्यामुळे सखोल चौकशी करुन कायदेशीर कारवाई कऱण्याची मागणी मनसुख हिरेन यांच्या पत्नीने केली असल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली होती..

विधानसभेत बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी सचिन वझे यांना अद्यापपर्यंत अटक का करण्यात आलेली नाही? अशी विचारणा करताना कोण पाठराखण करत आहे? असा प्रश्न उपस्थित केला. या गोंधळामुळे काल 9 मार्च विधानसभेचे कामकाज नऊ वेळा तहकूब झाले होते. आज विधिमंडळाचे कामकाज सुरू होताच विधिमंडळाच्या सचिन वाझे वरील कारवाईसाठी आक्रमक होते.

Tags:    

Similar News