गोपीचंद पडळकर यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadanavis) यांच्या उपस्थितीत वंचित बहुजन आघाडीची साथ सोडून भाजप पक्षात प्रवेश केला आहे. काही दिवसांपर्यंत वंचितच्या बाजूने कॉंग्रेसला महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत फक्त ४० जागांची ऑफर देणारे पडळकर आता भाजपच्या तिकिटावर बारामतीमधून अजित पवारांच्या (Ajit Pawar) विरुद्ध रिंगणात उतरणार आहेत. खुद्द मुख्यमंत्र्यांनीच अशी घोषणा केली आहे.
- ‘बिरोबाच्या शपथेचं काय झालं?’
- पडळकर बारामतीतून लढणार – मुख्यमंत्र्यांची घोषणा
- राज्यात पुन्हा भाजपचं सरकार आणण्यासाठी जीवाचं रान करू – गोपीचंद पडळकर
गोपीचंद पडळकर (Gopichand Padalakar) यांच्या भाजप पक्ष प्रवेशानंतर काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत (Sachin Sawant) यांनी "गोपीचंद पडळकर हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) पिट्टू आहेत. भाजपच्या सल्ल्याने ते वंचितमध्ये आले आणि धनगरांची मतं काँग्रेसला मिळू द्यायची नाहीत असा तो आराखडा होता. आता त्यांचं वंचित मधील काम संपलं आहे. म्हणून त्यांना पुन्हा भाजपात बोलावलं गेलं आहे." अशी खोचक टीका केली आहे.
https://youtu.be/ClVXOlCEGjg