‘आचारसंहिता लागण्याआधी झाला मोठा भ्रष्ट्राचार, चौकशी करा सगळं बाहेर येईल’- सचिन सावंत
२१ सप्टेंबरपर्यंत शासनाच्या सर्व विभागाने घेतलेल्या निर्णयामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असल्याची शक्यता असल्याने या सर्व निर्णयांची चौकशी करावी अशी मागणी काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे. तसं पत्र त्यांनी लोकयुक्तांना पाठवलं आहे.
सचिन सावंत म्हणाले की, निवडणुकीची आचारसंहिता लागणार आहे, याचा अंदाज असल्याने राज्याच्या मंत्रीमंडळातील अनेक मंत्र्यांनी आर्थिक लागेबांधे असलेले व स्वपक्षातल्या कार्यकर्त्यांना राजकीय व आर्थिक लाभ मिळवून देण्यासाठी अनेक अर्थपूर्ण निर्णय या आठवड्यात अत्यंत घाईगडबडीत घेतल्याचे दिसून येत आहे. राज्य सरकारचे संकेतस्थळ पूर्णपणे ठप्प झालेले आहे. अनेक निर्णय मागच्या तारखेत घेतले आहेत असे दाखवण्याचा प्रयत्न अनेक मंत्र्यांच्या कार्यालयात सुरु आहे. म्हणूनच १६ सप्टेंबर पासून आजपर्यंत घेतलेल्या सर्व निर्णयांची चौकशी करावी. तसेच आचार संहितेची अमंलबजावणी सुरु झाल्याच्या क्षणापासून कोणत्याही निर्णयाची माहिती शासकीय संकेतस्थळावर प्रकाशीत करण्यास मनाई करावी तसेच असे निर्णय तात्काळ रद्दबादल ठरवावेत. दि. २० सप्टेंबर पासून महाराष्ट्र शासनाचे संकेतस्थळ ठप्प का आहे? याची ही चौकशी करावी. अशी मागणी सावंत यांनी लोकायुक्तांकडे केली. पाहा काय म्हणाले सचिन सावंत..
https://youtu.be/ru7IcLJWLxY