'मोदी साहेबांना कोणीतरी सांगा निवडणुक काश्मीरची नाही, महाराष्ट्राची आहे!'- सचिन सावंत
नाशिक येथे आज भाजपाची महाजनादेश यात्रा समारोपा निमित्त जाहीर सभा पार पडली. या सभेस आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रमुख उपस्थितीत नाशिककरांना संबोधित केले. या भाषणात नरेंद्र मोदी यांनी काश्मीर मधील कलम 370 हटविण्याविषयी आपले मत मांडताना हा निर्णय कसा योग्य होता हे पटवून देण्याचा प्रयत्न केला.
मात्र नरेंद्र मोदी यांच्या भाषणावर काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी आपल्या ट्वीटर अकॉउंट वर मिश्किल टिपण्णी करीत आपला विरोध दर्शवला आहे. "मोदी साहेबांना कोणीतरी सांगा निवडणुक काश्मीरची नाही, महाराष्ट्राची आहे! 5 वर्षात महाराष्ट्रावरील कर्ज दुपटीने वाढले. शेतकरी आत्महत्या तिपटीने वाढल्या, उद्योग चौपटीने बरबाद झाले, बेरोजगारी दस पटीने वाढली, भ्रष्टाचार शतपटीने वाढला, फेकाफेकी थापा हजार पटीने वाढल्या, याचे काय ते सांगा?" अशी टीका सावंत यांनी केली आहे.
https://twitter.com/sachin_inc/status/1174624491512594432