सांगोला विधानसभा मतदारसंघातून रासप प्रवक्ते लक्ष्मण हाके यांनी बंडखोरी करत बहुजन विकास आघाडीकडून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
सांगोला तालुक्यातील जनता माझ्या सोबत असून, सर्वसामान्य माणसाला न्याय दिल्यावाचून राहणार नाही. असं म्हणत लक्ष्मण हाके यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.
आज भाई गणपतराव देशमुख यांचा पुरोगामी विचारांचा वारसा फक्त मीच चालवू शकतो. कारण आमच्या चार पिढ्यांनी शेकाप चा लाल बावटा उराशी बाळगला आहे, तालुक्यातील अनेक प्रश्न मार्गी लावायचे असतील तर, बहुजन विकास आघाडीला जनता निवडून देईल, असा विश्वास लक्ष्मण हाके यांनी यावेळी व्यक्त केला आहे.