लोकसभा निवडणुकी दरम्यान भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांच्यामध्ये मोठा वाद निर्माण झाला होता. यासाठी शिवसेना आणि भाजप शिर्ष नेतृत्वाला हस्तक्षेप करावा लागला होता. त्यानंतर हा वाद मिटला. या संदर्भात दानवे यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.
लोकसभा निवडणुकीत दानवेंच्या मोठ्या विजयानंतर दानवेंना केंद्रीय मंत्रीमंडळात स्थान मिळाले. त्यानंतर त्यांचा जालना येथे सर्वपक्षीय नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी जालना जिल्हयातील सर्व पक्षीय लोकप्रतिनिधी व नागरिक मोठ्यासंख्येने उपस्थित होते. यावेळी त्यांनी मतदरांच्या आभार मानत अर्जुन खोतकर आणि त्यांच्यातील वादासंदर्भात पहिल्यांदाच भाष्य करत मोठा गौप्यस्फोट केला.
"शिवसेना नेते अर्जुन खोतकर आणि आमच्यात निवडणुकी पूर्वी दोन महिने अगोदर सेटलमेंट झाली होती. नंतरच्या काळात केवळ नाटक सुरू होतं असं म्हणत गौप्यस्फोट केला आहे."