LIVE: शिवतिर्थावरुन राज ठाकरेंची लाईव्ह सभा
भाजपची कुजबूज चालते, राज ठाकरेला राष्ट्रवादी आणि काँग्रेसवाले वापरुन घेतायत, एवढा येडा नाही मी
मोदी आणि शाह मुक्त भारत व्हावा म्हणून न निवडणूक न लढवता मी महाराष्ट्रभर सभा घेणार आहे, त्याचा फायदा काँग्रेस आणि राष्ट्रवादीला झाला तर झाला
मोदी-शाह हे देशावरचं संकट दूर करण्यासाठी मी हवं ते करणार
निवडणूक न लढवता महाराष्ट्रात फिरणं हे दोन लोकांच्या संकटामुळे करतोय, याचा फायदा काँग्रेस आणि राष्ट्रवादीला होतोय तर होऊ द्या
1971 ला आरएसएसने इंदिरा गांधींना पाठिंबा दिला होता, आणीबाणीनंतरच्या निवडणुकीत काँग्रेसच्या असंख्य मतदारांनी जनता पक्षाला मतदान केलं
राजीव गांधींची हत्या झाली तेव्हा अनेकांनी काँग्रेसला पाठिंबा दिला, ज्यावेळी देश संकटात आहे, तेव्हा वेगळा विचार करणं गरजेचं असतं
मनात नसतानाही जर तुम्हाला संकट दूर करण्यासाठी दुसरं बटण दाबावं लागलं तर काय फरक पडतो? सध्या परिस्थितीच अशी आहे आणि या परिस्थितीमुळे मी निर्णय घेतलाय
अमित शाह आणि नरेंद्र मोदी असं वागले नसते तर मला हे करावं लागलं नसतं, आमच्या पंतप्रधानाची जगातली ओळख ही फेकू झाली आहे, इंटरनेटवर फेकू टाईप करुन पाहा, त्याचा अर्थ येईल
मोदींच्या खोट्या थापांना दाद द्यावी लागेल
गेल्या पाच वर्षात मोदींनी एकही पत्रकार परिषद घेतली नाही, कसली भीती वाटते तुम्हाला? पंतप्रधान पत्रकारांसमोर जाऊ शकत नाही का?
मोदींनी गुजरातच्या विकासाचं खोटं बुजगावणं उभं केलं
पाकिस्तानचे विमान पाडले असे नरेंद्र मोदींनी पुलवामा हल्ल्यांनंतर सांगितले होते परंतु अमेरिकेने पाकिस्तानला पुरवलेली सर्व एफ-16 विमानं जशीच्या तशी आहेत पाकिस्तानचे कोणतेही विमान पाडलेले नाही, असं अमेरिकेने स्पष्टीकरण दिले आहे
विरोधी पक्षाचं सरकार येतं तेव्हा आपल्याला काँग्रेसचं महत्त्व कळतं
पंतप्रधान होईपर्यंत नरेंद्र मोदींना आई आहे हे आम्हाला माहित नव्हतं, मग वर्षातून एकदा आईला भेटायचं, तेही मीडियाचे कॅमेरे घेऊन, ही कोणती पद्धत?
माझ्या 10 सभा या तुमच्यासाठी रिमाईंडर असतील, गेल्या पाच वर्षात तुम्ही काय ऐकलं ते दाखवणार आहे तुम्हाला
इतकं स्पष्ट बहुमत असतानाही मोदींनी देशाची वाट लावली
योजनांना नावे द्यायला या देशात मोठी माणसं जन्मली नाहीत का ?
मोदींनी कॉंग्रेसच्या योजनांची नावं बदलली... त्याच योजना पुन्हा लॉंच केल्या
मोदी मतांसाठी प्रत्येक गोष्टीचं भांडवल करतात
मोदींनी सत्तेत आल्यावर आधार कार्ड योजनेचे जोरदार समर्थन केले, परंतु हेच मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना म्हणाले होते की आधार कार्डचा कोणीही गैरवापर करू शकेल, घुसखोरांच फावेल
नमामी गंगे : 20 हजार कोटी कुठे गेले?
मोदींच्या कामगिरीचा सातबारा मांडण्यासाठी मी सभा घेणार
माध्यमांच्या मालकांच्या घरावर रेड टाकल्या जातात
मी तुम्हाला सांगितलं होतं मोदी निवडणुका जिंकण्यासाठी युद्धाची परिस्थिती निर्माण करतील आणि ती परिस्थिती आज आली, पुलवामाचा हल्ला झाला, आरडीएक्स येतं कुठून?
हिटलरने सगळ्या गोष्टी बंद केल्या होत्या, लोकांपर्यंत सत्यपरिस्थिती जातच नव्हती, तेच आज होतंय, नशिब आज सोशल मीडिया आहे
आपल्या सातारा सांगलीचे खूप सैनिक आहेत जम्मू काश्मीरमध्ये, जवान अतिशय कष्ट घेऊन आपली सुरक्षा करताहेत, त्यांचं हे राजकारण करतात
जम्मू काश्मीरमध्ये मेहबुबा मुफ्तींसोबत युती करताना नरेंद्र मोदींना लाज नाही वाटली
अमित शाहांनी एअरस्ट्राईक झाल्यावर घोषित केले की आम्ही 250 दहशतवादी मारले अमित शाह स्वतः गेले होते का को पायलट म्हणून?
एअर चीफ मार्शल म्हणतात की, आम्हाला किती माणसं गेली याचा आकडा देता येणार नाही मग भाजपने कुठून हा शोध लावला?
नरेंद्र मोदी म्हणाले होते की बीफ एक्स्पोर्ट करणारे माझे अनेक जैन मित्र आहेत.भाजपशासित राज्यांमध्ये गायी पोषक अन्न मिळालं नाही म्हणून गेल्या. हे कोणतं भाजपचं आणि मोदींचं गो प्रेम. आणि तरीही गोबंदीच्या नावाखाली अनेक माणसांना मारलं गेलं. हा उन्माद देशभर पसरलेला असताना मोदी शांत होते
लाल किल्ल्यावरून अमरावती मधलं हरिसाल नावाचं डिजिटल गाव घोषित केलं,त्या गावाची अवस्था आम्ही शोधून तुमच्या समोर आणलं आहे. गावात वायफाय रेंज नाही,डॉक्टर नाही, लोकांकडे मोबाईल नाहीत,बँकेला एटीएम नाही. जाहिरातीत ज्याला मॉडेल म्हणून उभं केलं तो म्हणतो त्याला काहीच फायदा झाला नाही
देशाचा पंतप्रधान कोण होणार हे कधीच ठरवलं नव्हतं
2014 च्या अगोदर भारतात जेवढी कॅश होती त्यापेक्षा काही पटींनी अधिक कॅश भारतात उपलब्ध असल्याचा आरबीआयने अहवाल दिला आहे ही कॅश आली कुठून? राज ठाकरेंचा सवाल
नोटाबंदी होणार जमून अनेकांनी आधीच जमिनी घेऊन ठेवल्या
शेखर रेड्डीच्या घरात धाड टाकली त्याच्या घरात 33 कोटी रुपयांच्या 2 हजार आणि 500 च्या नव्या नोटा सापडल्या होत्या
नोटबंदीच्या आधी भारतीय जनता पक्षाने देशभरात जमिनी घेऊन ठेवल्या दिल्लीत 1 लाख 70 हजार चौरस फुटांचं ऑफिस बांधलं आलिशान सेव्हन स्टार ऑफिस बांधायला पैसे कुठनं आले?